राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी गठित समितीने केलेल्या शिफारशींना तत्वत: मान्यता देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यामध्ये मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रʼ कंपनी कायद्यानुसार ना-नफा तत्त्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. या केंद्रासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार होता. त्यानुसार राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करण्याचा निर्णय शिदे सरकारने घेतला असून, हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राला मान्यता देण्यात आली आहे.
लक्षवेधी बातमी : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी अभ्यासक्रमात बदल करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अतिमहत्वाची बातमी : ई-पीक पाहणीचा नवीन ॲप उद्यापासून शेतकऱ्यांसाठी उलपब्ध

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1