अवकाळी आणि लांबलेला परतीचा पाऊस यामुळे यंदा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र सध्या सर्वच फळांचे विशेषत: केळीचे भाव वाढल्याने केळी उत्पादकांना दिलासा मिळत आहे. विशेषत: हिवाळ्यात केळीच्या दरात मोठी घसरण होत असताना मात्र यंदा केळीची मागणी वाढल्याने दर तेजीत आले आहेत. केळीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता केळी व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
अर्थसंकल्प 2023-24 : नैसर्गिक शेतीसाठी 1 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मदत !
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सफरचंदचे दर निचांकी असताना मात्र केळीची किंमत वाढताना दिसत आहे. गेल्या वर्षी केळीला 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल भाव होता, मात्र आता हा भाव 1500 ते 3000 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या काही दिवसांत बाजारात केळी 4,000 रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाईल असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे. मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना आधिक होणार आहे. तर याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी यंदा महाराष्ट्रात केळीचे उत्पादन घटले आहे. दुसरीकडे केळीवरील करपा रोगामुळेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मंडईतील केळीची आवक झपाट्याने घटली आहे. त्यामुळेच केळीचे भाव वाढले असल्याचे केळी व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. केळीच्या भाववाढीमुळे व्यापारी खूश आहेत. मात्र शेतकरी फारसा खूश दिसत नाही.
अर्थसंकल्प 2023-24 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना प्रत्येक्षात काय मिळाले ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1