केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आता केळी संशोधन विकास महामंडळ निर्मिती करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य सरकारच्या पातळीवर याचा प्रस्ताव आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या दोन किंवा तीन महिन्यांत याबाबत अपेक्षित निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ब्रेकिंग : बैलगाडा शर्यतीचे हे आहेत नवे नियम
केळी महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेते स्व. हरिभाऊ जावळे यांनी केली होती. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हा प्रशासन व कृषी विभाग यांच्यामार्फत परिपूर्ण असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावाला मान्यता दिली जाईल.
केळी महामंडळ स्थापन झाल्यास जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत, आर्थिक विकास, केळी पिकावरील विविध समस्या व त्याचे निरसन करण्याकरिता सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

केळी पिकाच्या माध्यमातून पूरक उद्योगांना प्रोत्साहन आणि त्यासंबंधीची आवश्यक प्रशिक्षण याकरिता केळी संशोधन विकास महामंडळाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. यासंबंधीची मागणी माजी खासदार स्व. हरिभाऊ जावळे यांनी लावून धरली होती व या मागणीसाठी आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू केला आहे.
हेही वाचा : गोकुळच्या चेअरमनपदी अरुण डोंगळे यांची वर्णी
दरम्यान, याबाबत जानेवारी महिन्यात पुणे येथे बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले होते. मात्र, ती बैठक होऊ शकली नव्हती. आता ती बैठक पुणे येथे न होता जळगावला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता असून, या केळी संशोधन विकास महामंडळाचे मुख्यालय जळगाव येथे होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर संपूर्ण देशांमध्ये केळी उत्पादनात अग्रेसर असा हा जिल्हा आहे. जळगावला केळीचे आगार म्हणून देखील संबोधले जाते. जळगाव जिल्हा व्यतिरिक्त राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये केळीचे उत्पादन घेतले जाते. संपूर्ण राज्याचा विचार केला तर 74,000 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. यापैकी एकट्या जळगाव जिल्ह्यात 45 हजार हेक्टर क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केली जाते व उत्पादन घेतले जाते.
ब्रेकिंग न्यूज : लातूर जिल्ह्यात जनावरांना पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव
संपूर्ण राज्याचे केळी उत्पादनाचा विचार केला तर ते 49 लाख टन एवढे असून, त्यातील 39 लाख टन उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात होते व त्यातही जळगाव जिल्ह्यातील रावेर, चोपडा आणि यावल या तालुक्यांमध्ये जास्तीचे उत्पादन होते. त्यामुळे जळगाव येथे या महामंडळाचे मुख्यालय होण्याची दाट शक्यता आहे.
तसेच या महामंडळाचे प्रमुखपद राज्याच्या फलोत्पादन मंत्र्यांकडे असण्याची शक्यता असून त्यासोबतच या महामंडळांतर्गत ज्या काही विविध समित्या असतील त्या जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमल्या जातील. राज्यातील इतर केळी उत्पादक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, संशोधक आणि संशोधन केंद्र असा वेगळा विभाग या माध्यमातून निर्माण होईल.
या केळी संशोधन विकास महामंडळाच्या माध्यमातून दर्जेदार केळीचे उत्पादन घेणे आणि केळीच्या निर्यात वाढीसाठी योजना आखणे व याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार पिक घेणे, शेतकरी तसेच उत्पादकांना अत्याधुनिक प्रशिक्षण, वातावरण बदलांमध्ये पिकात कसे बदल करावेत, केळीला बाजारपेठ कशी मिळवून द्यावी यासोबतच केळीपासून टॉफी, चॉकलेट बनवणे इत्यादी कारखाने कशा पद्धतीने सुरू करायचे इत्यादी बाबतचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आनंदाची बातमी : 14 ऑगस्टला लातूरमध्ये सोयाबीन परिषद : कृषीमंत्री सत्तार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1