शेततळ्यासाठी जागा निवडताना या बाबींचा विचार नक्की करा !

0
394

शेततळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविणे आणि त्याचा वापर ज्या वेळी पिकाला पावसाची किंवा पाण्याची गरज असेल त्यावेळी संरक्षित पाणी देण्यासाठी केला जावू शकतो. तसेच वर्षभर लागणाऱ्या पाण्याचा वापर देखील शेततळ्याच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. शेततळ्याच्या कार्यक्षम वापर व त्यातील पाण्याचा चांगला वापर करण्यासाठी शेततळ्याच्या बांधणी पासून विशिष्ट बाबींचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागेची निवड.

जेथे सहजासहजी विहीर खोदणे शक्य होत नाही तेथे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी शेततळे तयार करून पाणी साठविता येते. पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशा वेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. काही क्षेत्र रब्बी पिकाखालीही आणता येऊ शकते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, मत्स्य उत्पादनासाठी, पिण्यासाठी, घरगुती उपयोगासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो.

ज्या ठिकाणी जमीन जवळ जवळ सपाट असेल त्या ठिकाणी खड्डा खोदून तळे तयार करावे, तर काही ठिकाणी नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवून किंवा नाला शेताजवळून वाहत असल्यास त्याला आडवून शेततळ्यात पाणी साठवता येते.

शेततळ्यासाठी जागेची निवड : विचारात घ्या या बाबी

1. शेततळ्यासाठी ज्या क्षेत्रातून पावसाचे वाहून जाणारे पाणी येणार असेल त्या क्षेत्राचा उतार जवळपास चार टक्क्यांपर्यंत असावा. घळीला आडवा भराव घालून शेततळे तयार करणार त्याच्या वरच्या बाजूला घडीला चार ते सहा टक्के पर्यंत उतार असावा. म्हणजे तळ्यात साठवल्या जाणाऱ्या पाण्याला खोली जास्त मिळेल.

2. शेतीचा क्षेत्राचा विचार केला असता शेतात एका ठिकाणी पावसाचे पाणी गोळा होईल अशी जागा शेततळ्यासाठी निवडावी. म्हणजेच पृष्ठभागावरून मिळणारा अपधाव शेत तळ्यामध्ये साठवला जाईल.

3. शेततळ्याची जागा निवडताना अशी निवडावी की, खोदायचा होणारा खर्च हा कमीत कमी होईल. शेततळ्यासाठी पाणी साठवणूक घनता आणि मातीकाम घनता यांचे गुणोत्तर एक पर्यंत असावे तर घळीला आडवा भराव घालून केलेल्या शेततळ्यासाठी हेच गुणोत्तर पाच ते दहा पर्यंत असावे.

4. शेततळ्याच्या साठलेल्या पाण्याचा पुनर्वापर सोयीस्कर करता येईल असे ठिकाण निवडावे.

5. शेततळ्याच्या आराखडा शेतातून मिळणाऱ्या पावसाचे वाहून जाणारे पाणी वर आधारित असावा किंवा शेतकऱ्यांची वर्षभरातील पाण्याची गरज किती आहे.संपूर्ण पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवणे शक्य नाही त्या ठिकाणी हा विचार करावा त्यानुसार शेतकऱ्याची आखणी करावी.

6. शेततळ्यातून साठवलेले पाणी बाष्पीभवन आणि झिरपण्याद्वारे जाणार याचा अंदाज करून शेततळ्याचा आराखडा तयार करावा. जमिनीचा उतार आणि उपलब्ध पाण्याचा स्त्रोत अनुसार क्षेत्राचे प्रकार पडतात.

7. शेततळे तयार करताना त्यात येऊ शकणारी एकूण पाणी, शेततळे ज्या जागेवर तयार करायचे आहे तेथील जमिनीचा प्रकार, पाण्याची एकूण गरज, बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा व्यय या गोष्टींचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

👇👇👇 हेही वाचा 👇👇👇

काय आहे माती परिक्षणाचा मुलमंत्र ?

पीक संरक्षणात विविध अन्नद्रव्यांचे कार्य

पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करा गांडुळ खताचा वापर

8. शक्यतो शेततळ्याची जागा शेतातील सर्वात खोलगट भागाची अथवा टोकाचीअसावी.

9. शेतातल्या खाली जाणारी जमीन लागवडीयोग्य नसावी व या जागेतून पाझर देखील कमी असावा.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here