सध्या हळू हळू सेंद्रिय शेतीचे महत्व वाढत चालले आहे. शेतातील वाढता रासायनिक खतांचा वापर यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत असल्याने लोकांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढू लागला आहे. वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे लोकांना कॅन्सर सारख्या आजारांची आणि वेगवेगळ्या रोगांची लागण होत आहे. निंबोळी पेंड ही सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी वर्गाला खूप आवश्यक आणि फायद्याची ठरत आहे.
निंबोळी पेंडीचा शेणामध्ये वापर : सेंद्रिय शेती करण्यासाठी त्यात खत म्हणून नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जातो. यामध्ये पालापाचोळा, शेण, वैरण, गांडूळखत आणि लिंबोळ्या पासून बनवलेले आणि कुजवलेले खत यांचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडापासून मोठ्या प्रमाणात खत निर्मिती केली जाते. त्यास आपण ऑरगॅनिक खत असे सुद्धा म्हणतो. लिंबाचा पाळा आणि त्याच्या लिंबोळ्या या पासून निंबोळी पेंड तयार केली जाते. बाजारात याला मोठी मागणी सुद्धा आहे.निंबोळी खताचा वापर शेणामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. ऑरगॅनिक स्वरूपाचे खत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी या खताला आहे तसेच सेंद्रिय शेती साठी अत्यंत आवश्यक अशी ही निंबोळी पेंड आहे. निंबोळी पेंड ही फळबागायतदार कांदा उत्पादक शेतकरी आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी वर्गाला खूप आवश्यक आहे.
सेंद्रिय शेतीमध्ये निंबोळी पेंड फायदेशीर : सेंद्रिय शेतीमध्ये निसर्गत: उपलब्ध असणा-या संसाधनांचा वापर करुन पिकांचे सरंक्षण आणि पीक पोषण केले जाते. वनस्पतीजन्य संसाधनमध्ये कडूनिंबाच्या झाडापासून मिळणा-या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर सेंद्रिय शेतीमध्ये होतो. यात ही कडूनिंबाच्या बियांपासून तयार होणारी निंबोळी पेंड मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये वापरली जाते. मे-जून महिन्यात परिपक्व झालेल्या शुध्द निंबोळ्या गोळा करुन व्यवस्थित वाळविले जातात. त्यापासुन कोल्ड प्रेस्ड पध्दतीने निंबोळी पेंड तयार केली जाते. एक्पेलरमधून तेल न काढता तयार होणारी निंबोळी पेंड जास्त फ़ायदेशीर असते. यात निंबोळी मधील अॅझाडीरेक्टिन, निम्बीन, सलानिन हे घटक 100 ते 1000 पिपिएमपर्यंत तसेच सिलिका 15 % सह इतर उपयोगी तत्व आलेले असतात. यात 5 ते 7 टक्के तेल असते. त्यामुळे कीटकनाशक गुणधर्मासह इतर अन्नद्रव्ये शेतात मिसळले जातात. यात नत्र 3 – 5%, स्फ़ुरद 1% पालाश 1% या प्रमाणात असून पिकांच्या मुळांना हळुहळू उपलब्ध होतो. कडूनिंबातील विविध घटक जमिनीमध्ये गेल्यानंतर मुळांद्वारे शोषले जातात. या पद्धतीमुळे जमीनीतील वावरणा-या किडींचे तसेच पिकांवरील रसशोषक किडींचे देखील नियंत्रण होते. जमिनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या हानिकारक किडी जसे मुळे कुरतडणा-या अळ्य़ा, हुमणी यांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो. तसेच भाजीपाला पिकांवर डाळींब पिकाच्या मुळांवर गाठी करणा-या हानिकारक सुत्रकृमींचादेखील बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो. पिकांमध्ये निंबोळी पेंड वापरल्यानंतर 3 ते 6 आठवड्यात त्याचे फ़ायदे दिसू लागतात. निंबोळी पेंडमधील घटक जमिनीत हळूहळू काम करत असल्यामुळे सहा महिन्यांपर्यंत याचा परिणाम दिसून येतो.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
👇👇👇 पीक संरक्षणात विविध अन्नद्रव्यांचे कार्य 👇👇👇
👇👇👇 पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करा गांडुळ खताचा वापर 👇👇👇
निंबोळी पेंडचा शेतात वापर : निंबोळी पेंड शेणखत तसेच इतर सेंद्रिय खतांसोबत वापरण्यास अतिशय सुलभ आहे. रासायनिक खतांच्या बेसल डोसमध्ये देखील वापरता येते. निंबोळी पेंड मुळांच्या कार्यक्षेत्रात व्यवस्थित पोहचेल अशा पध्दतीने टाकावी. फ़ळझाडांमध्ये मुळांच्या जवळ ड्रिपरजवळ खड्डा घेउन त्यात निंबोळी पेंड टाकून मातीने बुजवुन घ्यावी. शेत तयार करताना देखील निंबोळी पेंडचा वापर करता येईल किंवा उभ्या पिकात निंबोळी पेंड फ़ोकुन, हाताने पसरवुन देता येते. भाजीपाला पिकामध्ये बेडमध्ये बेसल डोस टाकताना निंबोली पेंडचा वापर करता येतो. जैविक कीडनाशके-जैविक खते निंबोळी पेंडसोबत सुलभरित्या वापरता येतात. ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस, बिव्हेरिया, मेटारायझियम, पॅसिलोमायसिस, अॅझोटॊबॅक्टर, पिएसबी, केएमबी सारख्या उपयुक्त सुक्ष्मजिंवांचा वापर निंबोळी पेंडीला चोळून किंवा सोबत मिक्स करुन करता येतो. प्रमाण : फ़ळझाड : 1 किलो पासुन 5 किलो प्रति झाड प्रति हंगाम भाजीपाला पिके : बेसल डोसमध्ये 500 ते 1000 किलो प्रति एकरी केळी : 250 ग्राम प्रति झाड 2 महिन्यांच्या अंतराने ऊस लागवडीच्या वॆळेस 500 किलो 3 महिन्यांनतर 500 ते 1000 किलो
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
👇👇👇 गांडूळ खताचे महत्त्व 👇👇👇
👇👇👇 काय आहे माती परिक्षणाचा मुलमंत्र ? 👇👇👇
👇👇👇 कशी आहे ? गांडूळ खत निर्मितीची आधुनिक पद्धती 👇👇👇
निंबोळी पेंडीचे फायदे : शेतात निंबोळी पेंड घातल्यामुळे रानातील जमिनीतील वाळवी, हुमणी आणि ढेकूण या सारख्या किड्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण होते. वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी पासून पिकांचे संरक्षण होते. आणि पिके रोगराई ला बळी पडत नाहीत. शेतात निंबोळी पेंड घातल्यामुळे पिक वाढीस फायदा होतो त्याचबरोबर पिकाला अनेक वर्षे पर्यंत अन्नपुरवठा करत राहतात त्यामुळे इतर खतापेक्षा निंबोळी पेंड फायदेशीर ठरते. उपयुक्त असणाऱ्या जमिनीतील सूक्ष्म जिवाच्या वाढीसाठी उपयुक्त असते. त्यामुळे शेतात निंबोळी पेंड घालावी. शेतात सेंद्रिय कार्बन चे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेतातील उत्पन्न वाढण्यास मदत होते. आणि शेतातील मातीची सुपीकता वाढते. निंबोळी खताच्या वापरामुळे पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते.
संदर्भ : शेतीमित्र मासिक
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा