गेल्या दोन वर्षापासून खलावलेल्या हळदीच्या दरात गेल्या 15 दिवसात मोठी वाढ झाली आहे. वायदे बाजारात हळदीने दीड वर्षानंतर 9 हजाराचा टप्पा पार केला. तर बाजार समित्यांमध्येही हळदीचा भाव 7 हजाराच्या पुढे गेला आहे. हळदीच्या दरातील ही तेजी कायम राहील, असा अंदाज हळद व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
गुडन्यूज : राज्यात पुढीचे ५ दिवस मुसळधार ते अती मुसळधार ?
देशातील बाजारात मागील 15 दिवसांमध्ये हळदीच्या भावात चांगली सुधारणा झाली. हळदीच्या वायद्यांमध्ये मागील 10 दिवसांमध्ये तब्बल 20 ते 22 टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे.

13 जून रोजी हळदीचे वायदे 7 हजार 620 रुपये प्रतिक्विंटलवर होते. शुक्रवारी (दि. 23) वायदे 9 हजार 300 रुपयावर बंद झाले. गुरुवारी (दि. 22) वायद्यांनी एकदा 9 हजार 600 रुपयांचा टप्पा गाठला होता. मागील दीड वर्षांत पहिल्यांदाच हळदीच्या वायद्यांनी 9 हजारांचा टप्पा गाठला.
वायद्यामध्ये मोठी तेजी आली तरी प्रत्यक्ष बाजारामध्ये मात्र हळदीला मिळणारा भाव यापेक्षा कमी आहे. हळदीचे व्यवहार सध्या 7,000 ते 7,500 रुपयांनी होत आहेत. बाजार समित्यांमध्येही मागील पंधरवड्यात हळदीच्या भावात एक हजार रुपयाची सुधारणा झाली. तर बाजारातील हळद आवकही कमी झाली आहे. यामुळे दराला आधार मिळाला आहे.
मोठी बातमी : आता फक्त 1 रुपयात पीक विमा
चालू हंगामातील देशातील महत्वाच्या हळद उत्पादक भागात जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला नाही. म्हणजेच हळदीची लागवड 15 दिवस उशीरा होण्याचा अंदाज आहे. त्यातच मागील दोन वर्षे हळद उत्पादकांना कमी भाव मिळाला. त्यातच यंदा पाऊस उशीरा सुरु होत असल्याने हळद लागवड कमी होण्याची शक्यता आहे.
यंदा महाराष्ट्रातील हळद लागवड 10 ते 20 टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. तर तमिळनाडूत 10 ते 15 टक्के आणि आंध्र प्रदेश तसेच तेलंगणातील हळद लागवड क्षेत्र 18 ते 22 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हळदीच्या भावात सुधारणा झाली. तसेच हळदीच्या दरातील तेजी पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

देशात चालू हंगामात 13 लाख टन हळद उत्पादन झाल्याचे भारतीय मसाला बोर्डाने म्हटले आहे. पण देशातून हळद निर्यातही चांगली सुरु झाली. त्यातच सध्या मालाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे बाजारातील आवक जवळपास 50 टक्क्यांनी कमी आहे. एप्रिल महिन्यात देशातून जवळपास 20 हजार टनांची निर्यात झाली. मार्च महिन्याच्या तुलनेत ही निर्यात 4 टक्क्यांनी अधिक होती. तर एप्रिल 2022 च्या तुलनेत 42 टक्क्यांनी जास्त होती.
जागतिक पातळीवर हळदीला मागणी चांगली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या तुटवडा दिसतो. त्यातच देशातील हळद लागवड घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीच्या दरात वाढ झाली. बाजारातील घटक पाहता हळदीच्या दरातील तेजी कायम राहू शकते.
चिंताजनक : डाळिंबाचा मृग बहर अडचणीत

https://www.facebook.com/shetimitramagazine03