वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृतांच्या नातेवाइकांना वन विभागाकडून 20 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असून जखमी आणि पशुहानी झाल्यास देण्यात येणाऱ्या मदतीतही मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी हत्तीमुळे झालेल्या हानीपोटी 50 हजार ते एक लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
महा ब्रेकिंग न्यूज : खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता
राज्यात वाघ, बिबट्या, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, मगर, हत्ती, रानकुत्र्यांच्या हल्ल्यांत अलीकडे मोठी वाढ झाली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागला आहे. तसेच अनेकदा गायी, म्हशी, बैल, शेळ्या मेंढ्यांवरही हल्ले होतात. या हल्ल्यात पशुहानीही होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास 20 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

यापैकी 10 लाख रुपये तातडीने धनादेशाद्वारे आणि उर्वरित 10 लाख रुपये राष्ट्रीयीकृत बँकेत मुदतबंद ठेव स्वरूपात देण्यात येणार आहे. व्यक्तीला अपंगत्व आल्यास पाच लाख आणि गंभीररीत्या जखमी झाल्यास एक लाख 25 हजार रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाल्यास त्याच्या औषधोपचाराचा खर्च देण्यात येणार आहे. खासगी दवाखान्यात उपचार केल्यास 20 हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे.
ब्रेकिंग : ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचा उद्या मेळघाटात शुभारंभ
पाळीव प्राण्यांसाठी गाय, म्हैस आणि बैलाचा मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या 75 टक्के किंवा 70 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येणार आहे. तसेच कायमचे अपंगत्व आल्यास बाजारभावाच्या 50 टक्के किंवा 15 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती, मेंढी, बकरी आणि इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या 75 टक्के किंवा 15 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल देण्यात येणार आहे.

पाळीव जनावरांच्या औषधोपचारासाठी खर्च देण्यात येणार आहे. हे औषधोपचार शासकीय किंवा जिल्हा परिषदेच्या पशुचिकित्सालयांमध्ये मोफत करण्यात येतील. खासगी चिकित्सालयांत उपचार केल्यास बाजारभावाच्या 24 टक्के किंवा 5 हजार रुपये यांपैकी जी रक्कम कमी असेल ती अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात येणार आहे.
मोठी बातमी : महा-ऊस नोंदणी ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1