दोन वर्षापूर्वी ज्या कांद्याने शेतकऱ्यांना मालामाल केले तोच कांदा आता शेतकऱ्यांना रडण्याची वेळ आणत आहे. देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन करणारे महाराष्ट्र हे राज्य असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव गडगडले असून सध्या कांद्याला केवळ 1 रूपयांपासून 10 रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. यामुळे कांद्याचा दर आणि उत्पादन खर्च यात कसलाच मेळ बसत नसल्याने कांदा उत्पादकांना तोट्याचा धंदा करण्याची वेळ आली आहे.
हे वाचा : लिंबू 10 रुपयाला दोन, घेतंय का कोण ? का लावू शरद पवारांना फोन ! शेतकऱ्याचा व्हीडिओ व्हायरल
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी उत्पादन खर्चही निघत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सध्या राज्यातील बाजार समित्यामध्ये सध्या कांद्याचा भाव हा एक ते दहा रुपयांपर्यंतच मिळत आहे. पण कांद्याचा उत्पादन खर्च हा 15 ते 20 रुपये इतका असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरं जावं लागत आहे.

मुंबई कृषी उत्पन बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या वर्षी कांद्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर झालं आहे. पूर्वी कांद्याचे उत्पादन हे कमी प्रमाणात घेण्यात येत होते. अलिकडे या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये राज्यातील कृषी उत्पन्न समित्यामध्येही वाढ झाली आहे.
नक्की वाचा : पुणतांब्यातून पुन्हा शेतकऱ्यांची आंदोलनाची हाक : सरकारला ७ दिवसाचे अल्टीमेटम
राज्यामध्ये कांदा साठवणूक करण्यासाठी स्टोरेजची सुविधा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे भाव मिळत नसताना तो कांदा साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही. याचाच फायदा अडते घेत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक केली जाते. यामुळे काही वेळा शेतकऱ्यांना 50 पैशांनीही कांदा विक्री करावी लागते. बहुतांशवेळी उत्पादन खर्चही निघत नसल्याने हा कांदा शेतकऱ्यांना रडवतोय.
औरंगाबादच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन दिवसांत 7 हजार 851 क्विंटल कांद्याची आवक झाली. परिणामी किमान 75 रुपये प्रतिक्विंटल म्हणजे 75 पैसे किलो नीचांकी भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहेत.
मान्सून अपडेट : मान्सून लांबणीवर !
वाढत्या महागाईचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसत आहे. मात्र त्याप्रमाणे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. मशागत, बी-बियाणे, लागवड, निंदणी, खते, काढणी असा एकरी उत्पादन खर्च 30 हजार रुपयांपर्यंत वाढला. तर यंदा कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असताना आवक वाढल्याने दर पडले आहे. त्यामुळे खर्च वाढला पण उत्पनातून होणार नफा काही वाढू शकला नसल्याचे चित्र आहे.
काल राज्यातील लासलगाव येथे कांद्याचा भाव 500 ते 1330 रुपये होता. नागपूर येथे 800 ते 1000 रुपये, अमरावती 100 ते 700 रुपये, येवला 125 ते 905 रुपये, पिंपळगाव 300 ते 1000 रुपये तर देवळा बाजार समितीमध्ये 100 ते 1255 रुपये असा होता. असा कमी दर मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.
महत्त्वाचा निणर्य : अखेर बांबू कोळशावरील निर्यात बंदी उठवली

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1