केंद्राकडून 17 पिकांच्या हमीभावात मोठी वाढ

0
365

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने खरीप हंगामात येणाऱ्या 14 पिकसह 17 पिकांच्या आधारभूत किंमतीमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे. आता या नव्या दराने सरकार शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पिकांची खरेदी करणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकित खरिप हंगाम 2022-23 साठी 14 पिकांच्या हमीभाव वाढीला मंजुरी देण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात अधिक वाढ करण्यात आली आहे.

मान्सून अपडेट : मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्रात  

खरीप हंगामातील पिकांवरील किमान आधारभूत किंमत मध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत 2022-23 साठी 14 खरीप पिकांच्या हमीभावामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

केंद्र सरकारने तीळाच्या हमीभावात सर्वाधिक वाढ केली. सोयाबीनला 350 रुपयांची वाढ मिळाली. तर कापसाला लांब धाग्यासाठी 355 रुपये आणि मध्यम धाग्यासाठी 354 रुपये वाढविण्यात आले. केंद्राने यंदा सोयाबीनसह इतरही तेलबिया पिकांच्या हमीभावात गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक वाढ करण्यात आली आहे.

मोठी बातमी : कृषी दिनापासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान : अजित पवार

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकित बुधवारी खरिप हंगाम 2022-23 साठी 14 पिकांच्या हमीभाव वाढीला मंजुरी देण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात अधिक वाढ केली. या 14  पिकांमध्ये तिळासाठी सर्वाधिक 523 रुपये वाढ करण्यात आली. 2021-22 च्या हंगामात सोयाबीनच्या हमीभावात 70 रुपये वाढ केली होती. मात्र यंदा 350 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळं सोयाबीनचा हमीभाव 3950 रुपयांनी 4300 रुपये झाला. तर मध्यम धागा कापसाच्या हमीभावात 354 रुपयांची वाढ करून 6080 रुपये करण्यात आला. तर लांब धागा कापसासाठी 355 रुपयांची वाढ देऊन 6380 रुपये हमीभाव जाहीर केला आहे.

आनंदाची बातमी : ऊस नोंदणीसाठी साखर आयुक्तालयाचा नवा ॲप

मुगाच्या हमीभावात 480 रुपये वाढ केली. मुगाचा हमीभाव आता 7275 रुपयांवरून 7755 रुपयांवर पोचला. तर तुरीच्या हमीभावात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही 300 रुपयांची वाढ करण्यात आली. हंगामात तुरीला आता 6600 रुपये हमीभाव जाहिर झाला. या पिकांमध्ये मक्याला सर्वांत कमी 92 रुपये वाढ मिळाली. मक्याचा हमीभाव 1870 रुपयांवरून 1962 रुपये करण्यात आला.

भूईमुगालाही 300 रुपयांची वाढ मिळाली. खरिपात आता भुईमुगाला 5850 रुपये हमीभाव मिळेल. मागील हंगामात 275 रुपये वाढ मिळाली होती. तर सूर्यफुलाचा हमीभावही 385 रुपयांनी वाढविण्यात आला. आता सूर्यफुलाला 6400 रुपयांचा हमीभाव जाहिर झाला. मागील हंगामात सूर्यफुलाला केवळ 130 रुपयांची वाढ मिळाली होती.

महत्त्वाची बातमी : अण्णा हजारेंच्या नव्या संघटनेची लवकरच घोषणा

केंद्र सरकारने खरिप हंगाम 2022-23 मध्ये तेलबिया पिकांच्या हमीभावात चांगली वाढली. तीळाच्या हमीभावात सर्वाधिक 523 रुपये वाढ झाली. तर सोयाबीन 350 रुपये, सूर्यफुल 385 रुपये आणि भुईमुगाला 300 रुपये वाढ मिळाली आहे.

महत्त्वाची बातमी : थांबा, पेरणीची घाई करु नका : कृषीमंत्री दादा भुसे यांचा सल्ला

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here