पोल्ट्री व्यावसाचा कर्दनकाळ ठरलेल्या बर्ड फ्लू या आजाराने महाराष्ट्रात पुन्हा शिरकाव केला असून, ठाणे जिल्ह्यातील वेहळोली (ता. शहापूर) येथील 300 कोंबड्यांचा 9 बदकांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झालेला आहे. या मृतपक्ष्यांचे नमुके भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. त्याचा तपासणी निष्कर्ष एव्हीयन एन्फ्यूएन्झा (एच5एन1 या स्ट्रेन) करीता पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे पशुरोग अन्वेषण विभागाचे पथक शहापूर येथील पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करणे आणि निर्जंतुकीकरण करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी दाखल झाले आहेत.
तत्पूर्वी या मृतपक्ष्यांचे नमुने परीक्षणासाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून या पक्षांचा मृत्यू हा H1N1 इन्फ्लूएंजामुळे झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झाले आहे. ज्या पोल्ट्री फार्म मध्ये या कोंबड्या मृत झाल्या त्या पोल्ट्री फार्म च्या परिसरातील जवळपास 25 हजार कोंबड्या मारण्याचे आदेश स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. चिकन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स वरही या याचा परिणाम पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्याच्या पशु विभागाला संक्रमण नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले आहेत
त्या सोबतच मृतपक्षांचे नमुने परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. या बाबतीत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब डांगडे यांनी सांगितले की शहापूर तालुक्यातील वेहोली या गावात जवळपास 300 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. पुण्याच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार या पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याने निष्पन्न झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये नजिकच्या परिसरातील 25 हजार कोंबड्या मारण्यात येतील असेही सीईओ यांनी स्पष्ट केले.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
केळीच्या दरात दीड वर्षातील विक्रमी वाढ
जुन्नर येथे उद्यापासून पर्यटन विभागाचा द्राक्ष महोत्सव
हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अहवाल खुला कराव : कृषीमंत्र दादाजी भुसे
याचा परिणाम शेअर मार्केटवर होऊन पोल्ट्री उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपनी वेंकीज इंडिया या कंपनीचे शेअर चार टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे. गुरुवारी या शेअरची किंमत 2156 इतकी होती तर ती घसरून 2073 रुपये इतकी झाली.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇