पपई हे अत्यांत नाजूक पीक असून संवेदनशील आहे. पपई पिकावर किडी-रोगांबरोबरच विषाणूजन्य तसेच बुरशीजन्य रोग येतात. त्याच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते. अन्यथा पपईच्या गुणवत्तेबरोबरच त्याचे उत्पादनही घटते.
बुंधा सड : या रोगाच्या नियंत्रणासाठी बाविस्टीन किंवा फायटॉलॉन १ ग्रॅम + १ लिटर पाणी या प्रमाणात घेवून बुंधा कपड्याने पुसून घ्यावा.
खोड कूज : याच्या नियंत्रणासाठी २ ग्रॅम रोडोमील + २ ग्रॅम एम-४५ + १ लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या मुळांना द्यावे.
मुळ सड : या रोगाच्या नियंत्रणासाठी एकरी दोन लिटर ट्रायकोडर्मा झाडाच्या मुळांना द्यावे.
करपा : या रोगाच्या नियंत्रणासाठी न्युऑक्रॉन १ मिली + अन्द्रॉकॉल १ ग्रॅम + १ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
भुरी : या किडीच्या नियंत्रणासाठी १ मिली कॉन्टॉफ + अडीच ग्रॅम पोटॅशिअम बाय कार्बोनेट + १ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
मोझॅक (व्हायरस) : याच्या नियंत्रणासाठी १ मिली परफेक्ट + १ लिटर पाणी किंवा २ मिली हॉवर्ट + १ लिटर पाणी असे आठ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.
रिंगस्पॉट व्हायरस : याच्या नियंत्रणासाठी ३ किलो कॉलशियम नायट्रेट + १ किलो बोरॉन या प्रमाणात ठिबकमधून द्यावे.
थ्रिप्स (मोझॅक) : याच्या नियंत्रणासाठी १ ग्रॅम टाटामाणिक + १ ग्रॅम अॅन्द्रॉकॉल + १ ग्रॅम ऑडोमिनमॅक्स + १ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
मिलीबग : ३० ग्रॅम आडमायर (बायर कंपनीचे) + १०० लिटर पाणी या प्रमाणात आठ दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. किंवा एकरी २०० ग्रॅम आडमायर ठिबकमधून द्यावे.
शिवाजी बोडके ‘गरुड झेप’, वडवळ स्टॉप, मोहोळ-सोलापूर रोड (एनएच-६५), मोहोळ, जि. सोलापूर (महाराष्ट्र) (मोबा. ९८८१३२५५५५, ९४२२६४६४२५)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख/बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा