बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ब्रेक द लाईफस्टाईल नवी संकल्पना

0
356

कापूस लागवडीत अग्रकमांकावर असलेल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी 2002 मध्ये बीटी जनुक असलेल्या कापूस वाणाचा वापर भारतामध्ये सुरू झाला मात्र बोंड अळीचा प्रादुर्भाव बीटी कापसावरही दिसून आला. विशेषत: कोणतेही रासायनिक कीटकनाशकाचा आता बोंड अळीवर कसलाही परिणाम होत नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने नवनव्या उपाययोजना समोर येत आहेत. अशातच जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ब्रेक द लाईफस्टाईल ही नवी संकल्पना मांडली आहे.

आनंदाची बातमी : देशी गायींच्या देखभालीसाठी दरमहा मिळणार ९०० रुपये !

जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती, सर्व जिनिंग प्रसिंग मिल्स व कापूस सरकीपासून तेल काढणारे उद्योजकांची बैठक नुकतीच घेतली. त्यावेळी त्यांनी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द लाईफस्टाईल ही संकल्पना जिनिंग प्रसिंग मिलचालकांनी राबविण्याचे आवाहन केले. यावेळी खानदेश जिनिंग प्रसिंग अमोसिएशनचे अध्याक्ष प्रदीप जैन, अविनाश काबरा, विविध बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी उपसंचालक अनिल भोकरे व विभीय कृषी अधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा : किसान रेल्वे तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की सद्य:स्थितीस जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग मिल्सधारकांच्या गोडाउनमध्ये कापूस व सरकी मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आली आहे. या गोडाउनमध्ये ठेवलेल्या कापूस, सरकीमध्ये शेंदरी बोंड अळीचे कोष मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. या किडीस पोषक वातावरण तयार झाल्यास त्यांचे स्थलांतर होऊन या किडीचा प्रसार होण्याची दाट शक्‍यता आहे. यामुळे जिनिंग प्रेसिंग मिलचालकांनी बोंड अळी निर्मूलन मोहिमेत सहभागी व्हावे.

महत्त्वाची बातमी : विदर्भात उष्णतेची लाट ; तर राज्य पुन्हा तापणार !

या वेळी बोलताना कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी कापूस जिनिंग मिल असोसिएशनच्या सदस्यांना चालू हंगामात शेंदरी बोंड अळीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी, त्याचे पुढील संक्रमण टाळण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

महत्त्वाची घोषणा : शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी अनुदान मिळणार

अशा करा उपाय योजना : कापूस जिनिंग मिलचालकांनी परिसराची साफसफाई करून घ्यावी. मिल्समध्ये दहा मीटर अंतरावर फेरोमन सापळे लावावेत. फेरामन सापळ्यामध्ये पकडलेले पतंग वेळोवेळी नष्ट करावेत. गोदामामधील कापूस ताडपत्रीने पूर्णपणे झाकून ठेवावा. शेतकऱ्यांनाही कामगंध सापळे लावण्यास सांगावे. पतंग सापडल्यास थायोडीकार्ब कीटकनाशकाची फवारणी करावी. खरीप हंगामपूर्व तयारी पूर्ण करावी. शेतातील पऱ्हाट्यांचे तुकडे करून शेतात गाडावेत. त्यांचा वापर शेताबाहेर कंपोस्ट तयार करण्यासाठी करावा. एप्रिल-मे महिन्यात जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. कापसाची मे महिन्यातील लागवड टाळावी. गावनिहाय एकाच वाणाची, एकाच वेळी लागवड करावी.

हे वाचा : शाश्वत उत्पन्नासाठी बांबू लागवड किफायतशीर : जयंत पाटील

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here