परतीच्या पावसाने 20 सप्टेंबर रोजी राजस्थान आणि कच्छच्या भागातून सुरु केलेला परतीचा प्रवास अखेरच्या टप्प्यात आला आहे. रविवारी दि. 23 ऑक्टोंबरला मान्सून परतीचा पाऊस देशाला बायबाय करेल असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
मोठी बातमी : परतीच्या पावसाने द्राक्षबागा धोक्यात
यंदा परतीच्या पावसामुळे राज्यात धुमाकूळ घातला असून, या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा परतीच्या प्रवासात मान्सूनची वाटचाल अडखळत सुरू होती. मात्र आता हा परतीचा प्रवास आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. गुरूवारी देशाच्या बहुतांशी भागातून मान्सून परतला आहे. तर शुक्रवारी (ता. 21) संपूर्ण छत्तीसगड, आडिशा, विदर्भाच्या बहुतांश भागासह आंध्र प्रदेशच्या काही भागातून काढता पाय घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. रविवारपर्यंत (ता. 23) मान्सून संपूर्ण देशाचा निरोप घेण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

परतीच्या मान्सून पावसाने यंदा 20 सप्टेंबर रोजी राजस्थान आणि कच्छच्या भागातून परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासात मान्सूनची वाटचाल अडखळत सुरू होती. तब्बल महिनाभर वाटचाल केल्यानंतर गुरूवारी (ता. 20) परतीच्या मान्सून पावसाने संपूर्ण झारखंड, पश्चिम बंगाल, ईशान्य भारतातील राज्य, ओडिशाच्या बहुतांशी भाग, विदर्भ, छत्तीसगडच्या आणखी काही भागातून माघार घेत बहतांशी देशातून माघार घेतली आहे.
हे नक्की वाचा : सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही : कृषीमंत्री सत्तार
परतीच्या मान्सून पावसाने शुक्रवारी (ता. 21) संपूर्ण छत्तीसगड, आडिशा, विदर्भाच्या बहुतांश भागासह आंध्र प्रदेशाच्या काही भागातून मुक्काम हलवला आहे. डहाणू, बुलढाणा, काकीनाडा, रामगुंडम पर्यंतच्या भागातून मान्सून परतला आहे. रविवार (ता. 23) पर्यंतच्या 24 तासांत मान्सून संपूर्ण देशाला बायबाय करण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मोठी बातमी : गोकुळच्या दूध खरेदी दरात उद्यापासून वाढ

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1