केंद्राचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर !

0
554

हरित हायट्रोजन हे एक पर्यावरण पूरक इंधन असून, याचा वापर सध्याच्या प्रदूषणकारक जीवाश्म इंधनाला पर्यावरणपूरक म्हणून होऊ शकतो. तसेच राज्यातील साखर उद्योग शाश्‍वत विमान इंधन तायर करू शकतात. एकूणच आर्थिक चालना देण्यासाठी हरित हायड्रोजन धोरणाचा वाव मिळणार असून यातून 2025 पर्यंत 30 दशलक्ष रोजागार निर्मिती होणार आहे.

सध्या वाहतूक, उर्जा आणि औद्योगिक क्षेत्रात या हरित हायड्रोजनचा वापर केल्यामुळे पर्यावरणातील कार्बनचे वाढणारे प्रमाण रोकता येवू शकते. हरितगृहातील वायूचे उत्सर्जन टाळले जाऊ शकते. विशेष म्हणजे यातून कार्बनडाय ऑक्साईड वातावरणात फेकला जात नाही. हरित हायड्रोजन हा सौर आणि पवन उर्जेप्रमाणे अपारंपारिक उर्जेप्रमाणे काम करीत असल्याने मानवी जीवाला याचा धोका होणार नाही. अशा या हरित हायड्रोजनचा वापर 2025 पर्यंत 18 टक्क्यांपर्यंत जाणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातून तब्बल 30 दशलक्ष रोजगार निर्माण होईल असही अंजात वर्तविला जात आहे.

👇👇👇 हेही वाचा 👇👇👇

देशी जुगाड : हे पाहून आनंद महिंद्रा चक्क काय म्हणले ?

गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी या बाबी लक्षात घ्या !

स्मार्ट शेतसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचविले हे सात मार्ग

एफआरपी निर्णयाविरुद्ध सदाभाऊ खोत यांचे 27 पासून आंदोलन  

हा हरित हायड्रोजन वायू 2020 पासून 7 दशलक्ष टनपर्यंत वापरला गेला. ऑक्सिजनच्या मदतीने हायड्रोजन वायू विद्युतशक्ती व बाष्पशक्ती तयार करतो. सर्वात पहिल्यांदा समुद्राचे पाणी शुद्ध करतो त्यानंतर सौर किंवा पवन उर्जेतून तयार झालेल्या विजेतून पाण्याला विद्युत करंट सहज देता येऊ शकते. या प्रोसेस ने हायड्रोजन व ऑक्सिजनचे अणू वेगवेगळे होतात. या पद्धतीने इलेक्ट्रोलिसिस तयार झालेला वायुरूप हायड्रोजन औद्योगिक कामासाठी इंधन म्हणून वापरता येतो. असा हा हायड्रोजन वायूचा फायदा आहे. तसेच हरित हायड्रोजन धोरण देशाच्या वायू आधारित पर्यावरणपूरक इंधन निर्मितीला चालना देईल असा दावा जैवइंधन तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here