Custard Apple : सीताफळ (Custard Apple) या कोरडवाहू फळपिकामध्ये (Dryland fruit) लागवड, विस्तार आणि संशोधन अशा त्रिस्तरीय व अद्वितीय काम करणारे बार्शी येथील डॉ नवनाथ कसपटे (Dr. Navnath Kaspate) यांच्या कामाची दखल बिकानेर (Bikaner) (राजस्थान) येथील केंद्रीय कोरडवाहू फळ संशोधन केंद्राने (ICAR) (Central Dry Fruit Research Centre) घेतली आहे. काल शनिवारी केंद्राचे संचालक डॉ. जगदीश राणे (Dr. Jagdish Rane) यांनी आपल्या टीमसह डॉ. कसपटे यांच्या सिताफळ संशोधन केंद्र व मधुबन फार्म अॅन्ड नर्सरीला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. नवनाथ कसपटे यांच्या सिताफळातील संशोधन (Research) कामाचे कौतुक केले.
हेही वाचा : शेतीच्या दृष्टीने हे आहे ; घटस्थापनेचे महत्त्व
यावेळी त्यांच्या समवेत जाधववाडी (Jadavvadi) येथील अंजीर व सिताफळ संशोधन केंद्राचे (Fig and Sitafruit Research Centre) वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. युवराज बालगुडे (Balgude) व शेती अभ्यासक प्रकाश कुलकर्णी, बायो रिसोर्सचे जगन्नाथ सोनावणे उपस्थित होते. त्यांनी प्रथम डॉ. कसपटे यांच्या बार्शी येथील सिताफळ संशोधन केंद्रास (Custard Apple Research Centre) भेट दिली. त्यावेळी त्यांनी डॉ. कसपटे यांनी विकसित केलेल्या सिताफळाच्या नवीन वाणाच्या प्लॉटला भेट देवून त्याची वैशिष्ट्ये समजावून घेतली. त्यावर पडणाऱ्या किडी आणि रोगाच्या (insect and disease) बचावासाठी काय करता येईल ? याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आजच्या दौऱ्यात कसपटे यांच्याकडून सिताफळाची सविस्तर माहिती घेतली.
दुपारच्या सत्रात त्यांनी कसपटे यांच्या गोरमाळे येथील मधुबन फार्म अॅन्ड नर्सरीला भेट दिली. तेथे नऊ एकर क्षेत्रावर सिताफळाच्या नवनवीन वाणावर सुरू असलेल्या संशोधन कामाचीही त्यांनी माहिती घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, हे नव्याने तयार होणारे काही वाण फळासाठी चांगले असतील. मात्र यातील बऱ्यापैकी वाण हे फळासाठी नव्हे तर रुटस्टॉक, बिया अशा अनेक कारणांसाठी चांगले निर्माण होतील. त्याच्या बारीक-सारीक नोंदी (Records) आपण ठेवाव्यात, म्हणजे भविष्यात विद्यापीठाला किंवा आयसीएआरला (ICAR) संशोधन करताना त्या नोंदीचा उपयोग होईल.
ब्रेकिंग : लम्पीच्या बचावासाठी जनावरांनाही पीपीई किट : सांगोल्यातील पशुपालकाचा प्रयोग
यावेळी त्यांनी सिताफळाचे विस्तारलेले क्षेत्र, एनएमके-1 वाणाची निर्मिती, सिताफळावर येणारे रोग-कीड यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. डॉ. कसपटे यांच्या कामाचे कौतुक करून ते म्हणाले, राज्यातील नव्हे तर देशातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यासमोर डॉ. कसपटे (Dr. Kaspate) यांनी चांगला आदर्श घालून दिला आहे. त्यांचे काम पहाण्यासाठी युवा शेतकऱ्यानी नक्कीच त्यांच्या फार्मला भेट देण्याची गरज आहे. त्यातून नक्कीच शेतकऱ्याना प्रेरणा मिळणार आहे. मलाही येथे येण्यापूर्वी डॉ. कसपटे यांचे काम येवढे मोठे आहे; याची कल्पना नव्हती परंतु नक्कीच कसपटे यांचे काम एखाद्या संशोधन केंद्राच्या बरोबरीचे आहे.
सिताफळाच्या नव्या संशोधनासाठी डॉ. कसपटे (Dr. Kaspate) यांनी भरपूर वेळ दिला आहे. खूप मेहनत घेतली आहे. नक्कीच त्याचे फळ त्यांना मिळेल असा आशावाद (Optimism) व्यक्त करून त्यांनी कसपटे यांच्या संशोधन (Research) कार्यामध्ये तांत्रीक दृष्ट्या लागणारी मदत करण्याची तयारी यावेळी दर्शविली. यावेळी त्यांनी संशोधनाच्या कोणत्या नोंदी आणि त्या कशा प्रकारे ठेवाव्यात यासंदर्भात डॉ. कसपटे यांच्या संशोधन टीमबरोबर चर्चा केली.
यावेळी प्रविण कसपटे यांनी डॉ. राणे, डॉ. बालगुडे व शेतीअभ्यासक प्रकाश कुलकर्णी यांच्या शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. अॅड विक्रम सावळे यांची प्रास्ताविकात डॉ. कसपटे यांच्या कामाची थोडक्यात माहिती दिली. कृषीसहाय्यक गणेश पाटील यांनी जिल्ह्यातील सिताफळ लागवडीची माहिती दिली. यावेळी फार्मवरील सहकारी, कर्मचारी उपस्थित होते.