बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे सुरू झाल्याने लहानशा चक्रीय वादळाची निर्मिती झाली असून, राज्यात उद्या आणि परवा हवेच्या दाबात घसरण होणार आहे. याचा परिणाम झाल्याने बंगालच्या उपसागरात सुरू झालेले वादळ उद्या (मंगळवार) पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने येईल आणि राज्यात काही भागात जोराचे पाऊस होतील असा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. साबळे यांच्या मते बुधवारी (दि.13) अरबी समुद्रातही हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. गुरुवारी पश्चिम किनारपट्टील हे वादळ धडकणे शक्य आहे. शुक्रवारी (दि.15) बंगालच्या उपसागरात पुन्हा दुसऱ्या चक्रीवादळाची निर्मिती होईल. उष्णतेची लाट व ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता अशी विचित्र हवामान स्थिती, अस्थिर वातावरणाच्या हवामानामुळे जाणवेल. हवामान बदलाचा हा परिणाम आहे. एप्रिल महिन्यात होणारा पाऊस हा साधारणपणे ला-निना व अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे तापमान वाढल्यामुळे होईल.
कोकण : कमाल तापमान पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यांत 37 अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत 35 ते 37 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत 25 ते 26 अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. पालघर व ठाणे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता 51 टक्के, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत 81 ते 91 टक्के राहील. पालघर व ठाणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता 13 ते 18 टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 35 ते 48 टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग 4 ते 5 कि.मी. आणि वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
आनंदाची बातमी : लवकरच कृषीपंपासाठी नवे विभागनिहाय धोरण लागू होणार !
उत्तर महाराष्ट्र : नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात 42 ते 43 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत 24 ते 25 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 21 ते 31 टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 7 ते 8 टक्के राहील. बाष्पीभवनाच्या वेगात वाढ होईल. वाऱ्याचा ताशी वेग धुळे जिल्ह्यात 17 कि. मी., तर उर्वरित जिल्ह्यांत 11 ते 13 कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मराठवाडा : कमाल तापमान नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत 45 अंश सेल्सिअसपर्यंत, तर जालना जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उर्वरित उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उष्ण लहरी जाणवतील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान 27 अंश सेल्सिअस तर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत 27 अंश सेल्सिअस राहील. जालना व बीड जिल्ह्यांत किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस, तर औरंगाबाद जिल्ह्यात 25 ते 26 अंश सेल्सिअस राहील. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. मात्र उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 13 ते 29 टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 7 टक्के इतकी कमी राहील. जालना व उस्मानाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग 17 कि.मी. तर उर्वरित जिल्ह्यात ताशी 7 ते 11 कि. मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
महत्त्वाची बातमी : अजित पवार म्हणाले…उसाचे टीपरुही शिल्लक राहणार नाही
पश्चिम विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 12 ते 14 टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 6 ते 7 टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग 14 ते 17 कि. मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ : कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात 45 अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत 44 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत 27 अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 16 ते 26 टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 5 ते 6 टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग 10 ते 12 कि. मी. आणि दिशा आग्नेयेकडून राहील.
हे नक्की वाचा : म्हशीच्या दूध दरात वाढ
पूर्व विदर्भ : चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात 27 अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यात 26 अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत 25 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 42 ते 49 टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 7 ते 13 टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग 10 ते 18 कि. मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र : कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात 38 अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात 41 अंश सेल्सिअस, पुणे व नगर जिल्ह्यांत 42 अंश सेल्सिअस व सोलापूर जिल्ह्यांत 43 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात 28 अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत 23 ते 24 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यात 71 ते 76 टक्के, तर सोलापूर व पुणे जिल्ह्यांत 35 ते 44 टक्के, नगर जिल्ह्यात 26 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत 8 ते 11 टक्के, तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत 13 ते 27 टक्के राहील. सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग 20 कि. मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
हे नक्की वाचा : अतिरिक्त ऊसाबाबत अजित पवारांनी दिले निर्देश
कृषी सल्ला : काढणीस तयार हरभरा, गहू पिकाची कापणी आणि मळणीची कामे पूर्ण करावीत. नारळाच्या नवीन लागवड केलेल्या रोपांना काठीचा आधार देऊन सावली करावी. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची कामे पूर्ण करावीत. उन्हाळी भुईमूग पिकावरून मोकळा ड्रम फिरवावा.
(संदर्भ : अग्रोवन)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1