चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील शेतकरी सुरेश बापूराव गरमडे यांनी शोधून काढलेल्या एसबीजी – 997 या सोयाबीन वाणाला दिल्ली येथील वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने कायदेशीर मान्यता दिली आहे. 15 वर्षासाठी त्यांना उत्पादन, विक्री, बाजार, वितरण, आयात विक्री किंवा निर्यात करण्याचा अधिकार मिळाला आहे. सोयाबीन वाणाच्या बाबतीत असे अधिकार मिळवणारे ते महाराष्ट्र राज्यातील पहिले शेतकरी ठरले आहेत.

याबाबतची माहिती अशी की, बारा वर्षापूर्वी त्यांच्या शेतामध्ये लावलेल्या सोयाबीन मध्ये दोन वेगवेगळ्या गुणधर्माच्या दोन प्रकारच्या वनस्पती आढळल्या होत्या त्यानंतर त्यांनी एचएमटी वानाचे जनक दादाजी खोब्रागडे यांचा आदर्श ठेवला आणि त्या दृष्टीने सतत आठ वर्ष बियाण्याची वाढ करत त्याचे जतन व संवर्धन केले. या त्यांच्या वानाची सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असून, हे वाण एकरी 17 क्विंटल पर्यंत उत्पादन देते. याबाबतीत कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतीची वारंवार पाहणी केली. परंतु सतत आठ वर्षापासून एकच प्रकारचा निष्कर्ष समोर येत असल्याने कृषी अधिकारी देखील थक्क झाल्याचा दावा गरमळे यांनी केला आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
👇👇👇 राज्यात नर्सरी हब सुरू करणार : कृषीमंत्र दादाजी भुसे 👇👇👇
👇👇👇 शेतकऱ्यांनाही मिळणार आता पेन्शन 👇👇👇
👇👇👇 बारामतीत चक्क मिरचीसाठी होमिओपॅथी औषधाचा वापर 👇👇👇
👇👇👇 सातबारा उतारा होणार बंद; मिळणार प्रॉपर्टी कार्ड 👇👇👇
👇👇👇 लातूरमध्ये उभारली जाणार बांबूपासून इथेनॉल निर्मितीची रिफायनरी 👇👇👇
या वानाचा स्वामित्व हक्क मिळावा यासाठी त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने पुण्याच्या स्वामित्व हक्क प्राधिकरण कार्यालयांमध्ये 2018 मध्य प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर तेथून हा प्रस्ताव दिल्ली येथील मुख्य कार्यालयात पाठविण्यात आल्यानंतर सलग तीन वर्ष सोयाबीन संशोधन केंद्रात या वानाचा आढावा घेण्यात आला. या चाचणीमध्ये देखील हे वान सरस ठरल्याने प्राधिकरणाने गरमडे यांना त्या वानाच्या उत्पादन, विक्री, बाजार बाजार, वितरण व आयात-निर्यातीचा अधिकार दिला आहे.
वाणाची वैशिष्ट्ये : प्रतिकूल हवानानातही यलो मोझॅक या रोगाला हा वाण बळी पडत नाही. याचे एकरी 17 क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाच्या झाडाची उंची 75 सेंमीपर्यंत वाढते. एका झाडाला 140 ते 150 शेंगा लागतात. तीन ते चार दाण्याच्या शेंगा सर्वाधिक असतात. इतर सोयाबीनच्या तुलनेत यामध्ये तेलाचे प्रमाण अधिक आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा