फळ पीक विमा योजनेच्या माध्यमातून विमा कंपन्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी लागू केलेल्या जाचक आटी काढून टाकून शेतकर्यांना नुकसानीची भरपाई मिळावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने फळ पीक विम्याच्या निकषांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता शेतकर्यांना फळ पीक विम्याचा फायदा मिळणार आहे.
कृषी क्षेत्रात फळपीक शेतीचा वाटा खूप मोठा असला तरी प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात फळपिकाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकर्यांना नैसर्गिक आपत्ती, खराब हवामान यापासून वाचवण्यासाठी हवामान आधारित फळपीक विमा ही योजना आजपर्यंत राबवण्यात येत होती. विशेषत: या योजनेचा फायदाही शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र जून २०२० मध्ये पूर्वीच्या योजनेच्या निकषांमध्ये बदल करून २०२१ ते २०२३ या तीन वर्षासाठी पुनरर्चित हवामान आधारित फळपीक विमान योजना सुरू करण्यात आली. या योजनेत विमा कंपन्यांनी त्यांच्या फायद्याच्या जाचक अटी लागू केल्यामुळे बहुतांश फळबाग उत्पादक शेतकरी या योजनेपासून वंचीत राहिले.
गेल्या वर्षी पीक विमा काढूनही शेतकर्यांची नावे लाभार्थ्यांमध्ये आलीच नाहीत. बर्याच पिकांचे नुकसान होऊन देखील विमा कंपन्यांकडून कुठल्याही प्रकारची भरपाई न मिळाल्याने अनेकदा कृषी विभाग, सरकार दरबारी फेर्या मारूरही शेतकर्यांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान भाजपने मोठ्या प्रमाणनात आंदोलन केले. नवीन नियम बदलून जुनेच निकष लावण्याची मागणी शेतकर्यांनी केली. शेतकर्यांच्या प्रचंड रोषानंतर राज्य सरकारने दीड वर्षानंतर का होईना पीक विमा नियमात बदल करून शेतकर्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा दिला आहे.
राज्य सरकारने फळ पीक विम्याच्या निकषांमध्ये बदल केल्यामुळे लाखो शेतकर्यांना त्याचा फायदा होणार असून, द्राक्ष, डाळिंब, पपई, पेरू, आंबा, सीताफळ, संत्री, मोसंबी, लिंबू, काजू आदी फळपिकांना त्याचा फायदा होणार आहे.
फळपीक विम्याचे नवीन निकष
१) नवीन निकषानुसार १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या काळात तापमान सलग तीन दिवस ८ डिग्री सेल्सिअसच्या खाली राहिल्यास शेतकऱ्यांना २६ हजार ५०० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई कंपन्यांना शेतकऱ्यांना द्यावी लागेल.
२) १ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात सलग पाच दिवस तापमान ४२ डिग्री सेल्सिअसच्या पुढ राहिल्यास शेतकऱ्यांना ४३,५०० रुपये विमा संरक्षण मिळेल.
३) १ मार्च ते ३१ जुलै दरम्यान ४० किमी पेक्षा अधिक हवा वाहत असेल तर शेतकऱ्यांना ७० हजार रुपये भरपाई मिळेल.
४) १ जानेवारी ते ३० एप्रिल दरम्यान गारपीट झाल्यास ४३,५०० रुपये असे एकूण १,८६,६६७ रुपयांचे विमा संरक्षण शेतकऱ्यांना मिळेल.
परंतु यामध्ये महत्त्वाचे म्हणजे, गारपीट आणि वारा यांची माहिती शेतकऱ्यांनी तातडीने विमा कंपनीला कळवणे अत्यावश्यक आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा