राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणारे एकनाथ शिंदे यांची राजकारणात वेगळी ओळख असली तरी शेतीच्या कामाशी त्यांची नाळ कायम जोडलेली आहे. सध्या शेतात काम करतानाचे एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ आणि फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील असल्याचे आत्तापर्यंत सर्वांना माहिती झाले आहे. ते ठाण्यात राहत असले तरी साताऱ्यातील शेतीत ते कायम रमतात, याबाबत खूप कमी जणांना माहिती आहे. सण उत्सवाप्रमाणेच शेतातील प्रत्येक सुगीला त्यांची गावाकडे उपस्थिती असते आणि शेतात काम करुन घाम गाळण्याचा आनंदही ते घेतात.
मोठी बातमी : आरएसएफ निश्चितीच्या कार्यपद्धतीत बदल

राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारे एकनाथ शिंदे हे अनेक वर्षांपासून ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी या शहरी विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. पण त्यांची आजही शेतीची आवड कमी झालेली नाही. ठाणे जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात आपली पकड मजबूत करणाऱ्या या नेत्याने आजही शेती आणि मातीशी जोडलेले नाते अबाधित ठेवले आहे. ते नेहमीच वेळात वेळ काढून आपली शेतीची आवड जोपासतात. ते सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या ठिकाणी भात आणि स्ट्रॉबेरीच्या शेतीच्या कामात प्रत्यक्ष हातभार लावतात.

मान्सून अपडेट : राज्यात सरासरीपेक्षा उत्याल्प पाऊस
एकनाथ शिंदे, त्यांचे भाऊ प्रकाश, सुभाष आणि बहिण सुनीता यांच्या नावावर दरे तर्फ तांब या गावात शेती आहे. गावाकडचे अनेक लोक मुंबईत असल्यामुळे गावाकडची शेती वाट्याने गावातीलच एखाद्या व्यक्तीला करायला सांगतात. मात्र सुगीच्या दिवसात कामाला लोक मिळत नाहीत. आता पावसानंतर भातलावण सुरु होते. त्यामुळे वाट्याने शेती करणाऱ्या वारंगुळदाराने भातलावणीला येणार असाल तर शेती करतो अशी अट घातलेली असते. त्यामुळे मुंबईत असणारे अनेक लोक भात लावणी, काढणी आणि पेरणीच्या वेळेला गावाला जातात. जसे सणांसाठी गावाला जातात तसेच ते सुगीसाठीही गावाला जातात.

फायद्याच्या टिप्स : भेंडीवरील या 2 रोगाचे असे करा नियंत्रण
दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर व सुगीच्या काळात एकनाथ शिंदे देखील आपल्या दरे गावाला येतात आणि शेतीच्या कामात रममाण होतात. एकनाथ शिंदे, त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे आणि कुटुंबिय भाताची रोपे काढणे, लावणी करणे आणि मशागतीच्या कामांसाठी गावाला येतात. तेथे एकनाथ शिंदे हे स्वतः गुडघाभर चिखलात भात लावणी करतात. या तांबड्या मातीत घाम गाळात राजकारणाच्या सर्व गोष्टी विसरून ते शेतात काम करतात आणि घामही गाळतात. नोव्हेंबर २०२० मध्ये एकनाथ शिदे यांनी आपले मुळगाव असलेल्या दरेमध्ये कुटुंबीयांसह स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. त्याचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
मान्सून अपडेट : जुलै महिन्यात 94 ते 106 टक्के पाऊस !
शेतातील कष्ट काय आहे; याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी ते विविध योजना राबवित असतात. गावकऱ्यांसोबत ते विविध कार्यक्रमातही सहभागी होत असतात. भात लावणीनंतर येणाऱ्या गणेशोत्सावतही ते सहभाग होतात. त्याबरोबरच अनेकदा दिवाळी आणि यात्रेसाठीही गावाकडे हजेरी लावतात.
आनंदाची बातमी : 24 तास चालणार किर्लोस्करचा नवा पॉवर टिलर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1