अमरावती जिल्ह्यातील मासोद (ता. चांदूर बाजार) येथे लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट तयार करण्यात येणार आहे. राज्यातील लिंबुवर्गीय फळांच्या संशोधनाला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षस्थानी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
फायद्याची माहिती : घरच्या घरी तपासा बियाण्याची उगवण क्षमता
राज्यात संत्रा-मोसंबी या फळपिकांचे क्षेत्र विदर्भात 1.34 लाख हेक्टर इतके आहे. संत्र्याचे आरोग्यदायी गुणधर्म पाहता अधिकाधिक उत्पादने घेणे व त्यावर प्रक्रीया करणे गरजेचे आहे. मात्र या भागातील शेतकऱ्यांना कमी उत्पादकता, जुने तंत्रज्ञान, पारंपरिक सिंचन, यांत्रिकीकरणाचा अभाव अशा अडचणींना तोंड द्यावे लागते. सिट्रस इस्टेटच्या माध्यमातून निर्यातक्षम नवीन वाणांचे उत्पादन शक्य होऊ शकेल. तसेच शास्त्रोक्त पद्धतीने फळबागा विकसित होऊ शकतील, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.

मासोद येथे सिट्रस इस्टेटसाठी नव्याने सुविधा निर्माण करण्यासाठी 12 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद उपलब्ध करुन देण्यासाठी आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच सिट्रस इस्टेट स्थापन करण्याकरीता लागणारे मनुष्यबळ प्रतिनियुक्ती व बाह्य स्त्रोताव्दारे कत्रांटी पध्दतीने मनुष्यबळ भरण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मान्सून अपडेट्स : येत्या 5 दिवसांत मान्सून सर्वदूर

https://www.facebook.com/shetimitramagazine03