आज चंद्रपूरात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून पावसाने अक्षरशा थैमान घातले आहे. अवघ्या चार तासांत 240 मिलीलिटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे सारे रस्ते जलमय झाले असून, अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. या 4 तासाच्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
पावसाळी अधिवेशन : बोगस खते-बियाण्यासंदर्भात कडक कायदा आणणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चंद्रपूर शहरात आज झालेल्या पावसाने शहरातील बहुतांश भाग जलमय झाला. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप आले. शेकडो घरात पाणी शिरले. मागील दहा वर्षात असा पाऊस पहिल्यांदाच बरसल्याचे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
मागील तीन दिवसांपासून संथगतीने सुरू असलेल्या पावसाने आज (मंगळवार) सकाळपासूनच रोद्र रूप धारण केले. अखेर आज वीजगर्जनेसह दमदार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासूनच पाऊस सुरू होता. मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार उद्या (बुधवार) चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांना उद्याला (19 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले आहेत.
गुडन्यूज : राज्यात पावसाला पोषक हवामान : आगामी 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार
https://www.facebook.com/shetimitramagazine03