Pending FRP Nwes :राज्यातील ऊस उत्पादक (Sugarcane growers) शेतकऱ्यांची 2023-24 मधील गाळप हंगामातील एफआरपी (FRP) थकित (Pending) ठेवल्याप्रकरणी राज्यातील चार साखर कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश (Confiscation Order) साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी दिले आहेत.
महत्त्वाचे : कांद्याबाबत केंद्राने घेतला मोठा निर्णय : कांदा उत्पादकांना बसणार फटका
राज्यातील 86 साखर कारखान्यांकडील 817 कोटी रुपयांच्या थकित एफआरपीप्रकरणी (Pending FRP Case) साखर आयुक्तांनी या साखर कारखान्यांना नोटिसा (Notice) पाठवल्या होत्या. दरम्यान, गेल्या आठवड्यात त्यांची सुनावणी घेतली होती.
सोलापूर, हिंगोली, नगर आणि पुणे जिल्ह्यातील त्या 4 कारखान्यांनी 2023-24 मधील गाळप हंगामातील एफआरपी थकित ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत.
मोठी बातमी : टोमॅटो पाठोपाठ आता कांदाही महागणार ?
नोटिसा मिळाल्यावर 21 कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 125 कोटी रुपये एफआरपीची रक्कम जमा केली. त्यामुळे शंभर टक्के एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्या 146 झाली आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी ऊसतोडणी (Cane Cutting) वाहतूक (Transport) खर्चासह 34 हजार 840 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत.
जप्तीच्या कारवाईचे आदेश (Confiscation Order) दिलेल्या 4 कारखान्यांकडे मिळून 37.18 कोटी रुपये थकित एफआरपी असल्याने त्यांच्यावर आरआरसी झाली असून, नगर (Nagar) जिल्ह्यातील साजन शुगरकडे 2.46 कोटी, पुणे (Pune) जिल्ह्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याकडे 15.77 कोटी, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट येथील मातोश्री लक्ष्मी शुगरकडे 11.54 कोटी तर हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याकडे 7.41 कोटी एफआरपी थकित आहे.
उर्वरित 65 कारखान्यांकडून 692 कोटी रुपये एफआरपी देणे बाकी असल्याचे साखर संचालक (अर्थ) (Director Sugarcane) यशवंत गिरी यांनी सांगितले. या साखर कारखान्यावरही लवकरच कारवाई होणार असल्याचे कळते.
ब्रेकिंग न्यूज : दरवाढीच्या नियंत्रणासाठी टोमॅटोची नेपाळमधून आयात : अर्थमंत्री सीतारामण
https://www.facebook.com/shetimitramagazine03