गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी या बाबी लक्षात घ्या !

0
759

भारतात गव्हाचे पीक फार मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हरित क्रांतीमुळे ज्या पिकाच्या उत्पादनात भरीव वाढ झाली; त्यापैकी गहू हे पीक होय. गव्हाची उशिरा पेरणी केल्यामुळे पिकाच्या वाढीस लागणारे पोषक हवामान, पुरेसा काळ महाराष्ट्रात मिळत नाही व त्यामुळे गव्हाचे उत्पादन कमी येते. गव्हाचे उत्पादन वाढविण्यासाठी वेळेवर पेरणी, योग्य वाणाची निवड, खतांचा समतोल वापर, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत.

आंतरमशागत : एक किंवा दोन वेळी खुरपणी करून गव्हात आढळणार्‍या चांदवेल, हरळी यासारख्या तणांचे नियंत्रण करावे. तसेच कोळपणी करून जमीन चांगली ठेवावी. रूंद व पसरट पानांची वार्षिक वणे नष्ट करण्यासाठी पेरणीनंतर 4 ते 5 आठवड्यांनी आथसोप्रोटॉन (आयसोगार्ड) हे तणनाशक हेक्टरी 1 ते 1.5 किलो क्रियाशील घटक 800 लिटर पाण्यात मिसळून गव्हाच्या दोन ओळीत फवारावे.

महत्त्वाच्या अवस्था : गव्हाच्या पिकाच्या महत्त्वाच्या वाढीच्या चार अवस्था आहेत.

1. मुकुटमुळे फुटण्याची अवस्था ही पेरणीनंतर 18 ते 21 दिवसांनी येते.

2. कांड्या धरण्याचा काळ हा पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी येतो.

3. पीक फुलोऱ्यावर येण्याचा काळ हा पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी येतो.

4. दाण्यात चिकान असतानाचा काळ हा पेरणीनंतर 90 ते 95 दिवसांनी येतो.

गव्हाच्या महत्त्वाच्या अवस्था साधारण 20 दिवसांनी येत असल्याने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याचे नियोजन करावे. पाण्याचा साठा अपुरा असेल तर मात्र पाण्याच्या उपलब्धतेनुसार पेरणीपूर्वीचे ओलीत सोडून पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

पाणी व्यवस्थापन : एकच ओलीत करणे शक्य असेल तर 42 दिवसांनी पाणी द्यावे. दोन ओलीताची सोय असेल तर 21 व 65 दिवसांनी पाणी द्यावे. तीन ओलीताची सोय असेल तर 21,42 व 65 दिवसांनी पाणी द्यावे. चार ओलीताची सोय असेल तर 21, 42, 65 व 95 दिवसांनी पाणी द्यावे.

पीक संरक्षण : वातावरण ढगाळ असल्यास मात्र या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो यासाठी ऐमेक्रॉन किंवा नुआक्रॉन 10 मिली. 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

उंदीर व तांबेरा यांच्यामुळे गहू पिकाचे जास्त नुकसान होते. यासाठी उंदराचा वेळीस बंदोबस्त करावा यासाठी कोणतेही भरडधान्य घेऊन एक भाग झिंक फॉस्फाईड व थोडे गोडेतेल यांचे मिश्रण करून त्याच्या गोळ्या कराव्यात व त्या उंदराच्या बिळामध्ये टाकाव्यात व बिळे बुजवून टाकावीत.

गव्हाच्या पिकावर काळा व नारंगी तांबेरा यांचा प्रादुर्भाव होतो. काळ्या तांबोर्‍यामुळे उत्पादनात 20 ते 30 टक्के घट होते. पिकास जास्त पाणी व गैरवेळी पडलेले नत्र जर असेल तर ज्यावर  जास्त तांबेरा पडतो. तांबेरा दिसू लागताच डायथेन एम – 45 किंवा डायपेन झेड – 78 हे बुरशीनाशक 1.5 किलो 500 लिटर पाण्यातून फवारावे जरुरी भासल्यास परत 15 दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी घ्यावी.

👇👇👇 हेही वाचा 👇👇👇

गूह लागवडीचे सुधारित तंत्र

हरभरा लागवड केलीय ? मग; असे करा व्यवस्थापन

असे करा हरभर्‍यावरील घाटेअळीचे नियंत्रण

पीक संरक्षणात विविध अन्नद्रव्यांचे कार्य

हेक्टरी उत्पादन : पिकांची योग्य ती काळजी वेळेत घेतल्यास अधिक उत्पादन मिळते. बागायती गव्हाचे प्रती हेक्टरी 35 ते 40 क्विंटल उत्पन्न मिळते. तसेच जिरायती गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पादन साधारण 10 ते 15 क्विंटल उत्पादन मिळते.

वि. ली. ठोंबरे, अ. वा. मोरे विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here