कांद्याचे सरासरी उत्पादन इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. याची अनेक कारणे आहेत; त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे कांदा या पिकावर पडणारे विषाणूजन्य रोग हे आहे. विशेषत: कांद्यावरील काही विषाणूजन्य रोगाचा परिणाम त्याच्या साठवणीवर होतो. त्यामुळे नुकसान वाढते. मात्र विषाणूजन्य रोगाचे वेळीच नियंत्रण केल्यास कांदा उत्पादनात चांगलचा फरक पडतो. कांदा पीकावर प्रामुख्याने पिवया बुटका रोग, अॅस्टर यलो हे जिवाणूजन्य रोग पडतात.
कांद्यावरील पिवळा बुटका रोग : हा विषाणूजन्य रोग कांदा, लीक, लसूण इत्यादी पिकांवर येतो. कांद्याची झाडे बुटकी राहतात. पाने वाकडी होतात. पिवळी पडतात. पिवळेपणाची तीव्रता काही छटपासून तर संपूर्ण पान पिवळे होण्यापर्यंत असते. पाने चपटी आणि कडक होतात आणि वाकतात. फुलांचे दांडे बारीक राहतात व त्यावरही पिवळेपणा येतो.
उपाय : विषाणू पसरवणार्या किडीसाठी पिकांवर (0.03 टक्के) डायमेथोएट (10 मिली 10 लिटर पाणी) फवारावे. रोगग्रस्त झाडे उपटून टाकावीत. बिजोत्पादनासाठी चांगले पोसलेले निवडक कांदे वापरावेत.
हेही वाचा :
कांद्यावरील रोगांचे करा असे नियंत्रण
अशी करा कांदा रोपांची जोपासना !
उत्तमप्रतिच्या कांदा बियाण्यासाठी हे वापरा कांदा बिजोत्पादन तंत्रज्ञान
कांद्याच्या जाती आणि किड रोग व्यवस्थापन
हमखास पैसे मिळवून देणारे कांदा उत्पादन तंत्र
अॅस्टर यलो : हा रोग मायक्रोप्लाझामुळे होतो. रोगाची सुरूवात नवीन पानाच्या बुडापासून होते. पाने चपटी व रंगाने पिवळी बनतात. त्यावर उभे हिरवे पट्टे दिसतात. पिवळेपणा पानाच्या शेंड्याकडे वाढत जातो. फुलांचे दांडे बारीक व पातळ होतात. फुलांचा गुच्छ नेहमीप्रमाणे भरलेला न राहता लहान राहतो. त्यातील काही फुलांचे देठ लांबतात व सर्व फुले एका पातळीत राहत नाहीत.
उपाय : हा रोग रस शोषून घेणार्या किडींमार्फत पसरतो. किडींचा बंदोबस्त वरीलप्रमाणे करणे आवश्यक असते. रोगग्रस्त झाडे किंवा कांदे त्वरीत उपटून नष्ट करावीत. बियाणे पिकात अशी झाडे आढळल्यास ती उपटून नष्ट करावीत.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा