आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगली मागणी असून, यंदा कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि निसर्गाची साथ यामुळे महाराष्ट्रात यंदा कापूस भाव खाणार ! अशी शक्यता निर्माण झाली आहे. सध्या हरियाणा राज्यातील पालवाल जिल्ह्यात हंगामाच्या सुरुवातीलाच नव्या कापसाला 10 हजार रुपयांचा दर मिळाला आहे.
मोठी बातमी : पीएम किसान योजनेअंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम
कापूस हे महाराष्ट्रातल्या प्रमुख नगदी पीक आहे. मागच्या वर्षाचा हंगाम संपताना कापसाला 14 हजारांवर भाव मिळाला होता. यावर्षीही कापसाच्या पिकावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. सध्या हरियाणा राज्यातील पालवाल जिल्ह्यात या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरु झाली आहे. तिथे कापसाला सुरुवातीलाच 10 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. हरियाणा आणि पंजाबच्या इतर भागात सप्टेंबरपासून नवीन कापसाची आवक वाढणार आहे.
यंदा भारतात कापूस लागवड 6.65 टक्क्यांनी वाढली आहे. देशात नवीन कापूस साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मार्केटमध्ये येतो. सध्या 500 गाठींपेक्षा कमी कापूस बाजारात दाखल झाला आहे. यावेळी मात्र ऑगस्टमध्ये कापसाचे भाव आठ टक्क्यांनी वाढले आहेत. भविष्यात कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या कापसाची किंमत जवळपास दुप्पट आहे. नवीन कापसाला 9 हजार 900 ते 10 हजार रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीत कापसाचा सरासरी भाव 5 हजार रुपये होता. भविष्यात कापसाचा भाव 45 हजार ते 47 हजार रुपये प्रति गाठी असेल असे तज्ज्ञांचे मत आहे.
ब्रेकिंग : या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पहिल्या टप्प्यात मदत
गेल्या चार वर्षात कापसाचे भाव वाढत असून 2017-18 माध्ये कापसाला 4500-5000 रुपये भाव मिळाला होता. 2018-19 माध्ये कापसाचा भाव 4500-5000 रुपये असाच स्थिर होता. मात्र 2019-20 मध्ये त्यामध्ये थोडी वाढ होऊन तो 5600 रुपयांवर गेला. पुढे 2020-21 मध्ये पुन्हा त्यात वाढ झाली. त्यावर्षी कापसाला 5800 रूपये भाव मिळाला. मात्र 2021-22 मध्ये कापसाच्य भावात उच्चांकी वाढ झाली. गेल्यावर्षी कापसाला विक्रमी 8000-14000 रुपये भाव मिळाला.
महत्त्वाची बातमी : शेतकरी नेते पाशा पटेल यांचे पुत्र ॲड. हसन पटेल यांचे निधन
बाजारात कापसाची आवक वाढल्यानंतर भाव 35 हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. मात्र त्यानंतर पुन्हा दरात सुधारेल असा अंदाज आहे. तर कापसाच्या भाववाढीचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने धोरण राबवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान, कापसाच्या भावावरुन यावर्षीही राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाला नाही तर आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
मोठी बातमी : पावसाळी अधिवेशनात झाले 10 विधेयके मंजूर व 26 महत्त्वापूर्ण निर्णय
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1