Crop Insurance केवळ 1 रुपयात पीक विमा अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र गेल्या चार दिवसापासून पिक विमा भरण्यासाठी सरकारची वेबसाईट सतत हँग होत आहे. ही वेबसाईट योग्यप्रकारे व्यवस्थित चालत नसल्याने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मोठी बातमी : बोगस बियाणांचे नवे संकट ; 1 हजार 85 तक्रारी दाखल
राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी पहिल्यांदाच राज्य सरकारने जबाबदारी घेतली आहे. सरकारच्या या योजनेतून एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येणार आहे. मात्र, गेल्या चार दिवसापासून पीक विमा भरण्यासाठी सरकारची वेबसाईट योग्यप्रकारे चालत नसल्याने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन दिवसापासून शेतकरी सीएससी सेंटरवर पीक विमा भरण्यासाठी चकरा मारत आहेत. मात्र, पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट चालत नसल्याने त्यांना दिवसभर सीएससी सेंटरवरच बसून राहाव लागत आहे.
यावर्षी पहिल्यांदाच एक रुपयात पिक विमा भरून घेत जात असल्याने सर्वच शेतकरी पिक विमा भरण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे, सर्वच सीएससी सेंटरवर शेतकरी पिक विमा भरण्यासाठी गर्दी करत आहेत. दुसरीकडे मात्र पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट सतत हँग होत असल्याने शेतकऱ्यांना दिवस-दिवस सीएससी सेंटरवर बसून राहावं लागत आहे. पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख असून या तारखेच्या आत शेतकऱ्यांना पीक विमा भरावा लागणार आहे.
राज्यामध्ये एकूण एक कोटी 47 लाख शेतकरी आहेत यापैकी 1 कोटी 17 लाख शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरत आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पीक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र शेतकरी पीक विमा भरण्याविना राहणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
मोठी घोषणा : खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार : कृषिमंत्र्यांची घोषणा
https://www.facebook.com/shetimitramagazine03