गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत देणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली.
हे नक्की वाचा : शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत : राज्यपाल रमेश बैस
नुकसान झालेला एकही शेतकरी सुटणार नाही, यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत असल्याचे सांगून सत्तार म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना 2305 कोटी रूपये नुकसान भरपाईचे वाटप विमा कंपन्यांनी केले आहे. ही योजना केंद्र सरकारची आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला काही अधिकार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून असून, सत्तार म्हणाले, सरकार शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत करत असल्याचा दावा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केला.
मोठी बातमी : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1