काकडीवर मावा, तुडतुडे, देठ कुरतडणारी अळी, पाने खाणारे लाल भुंगेरे, फळमाशी, लाल कोळी व मुळावरील कृमींचा उपद्रव होतो. त्याशिवाय भुरी व केवडा या रोगांचादेखील उपद्रव होतो. यावर प्रतिबंधात्मक उपाय वेळीच केल्यास नुकसानीचे प्रमाण कमी करता येते. अशा प्रकारच्या रोग-कीडच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन चांगले येवूनही उत्पन्नात मात्र घट येते. त्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपायोजना करणे गरजेचे असते.
काकडी पीक संरक्षणासाठी उगवणीनंतर पहिली दोन पाने आल्यानंतर मोनोसिल एक मिली. एक लिटर पाण्यातून फवारणी करावी. चार ते सहा पानांवर असताना पुन्हा मोनोसिल एक मिली व बेन्गोर्ड एक ग्रॅम यांची एक लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्यानंतर दर पाच ते सहा दिवसाच्या अंतराने भरपूर पाने आल्यानंतर मोनसिल दोन मिली, बेन्गार्ड एक ग्रॅम व सिलकॉर्ड एक मिली यांची एक लिटर पाण्यातून फवारणी करावी. तसेच दर दहा दिवसांनी ह्युमिसिल एक मिली एक लिटर पाण्यातून फवारणी करावी.

नागअळी : नागअळी पानाच्या आत राहून हरितद्रव्ये खाते. पानावर वेडीवाकडे व्रण होतात. अळी जसजशी मोठी होते, तसतसे व्रण मोठे होतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने पिवळी पडून गळतात. याच्या नियंत्रणासाठी होस्टाथिऑन 400 मिली एक एकर साठी वापरावे.
पाने खाणारी अळी : या आळ्या पाने खातात आणि प्रादुर्भाव जास्त असल्यास झाड पर्णहिन होते व फक्त शिराच शिल्लक राहतात. याच्या नियंत्रणासाठी डेसिस 200 मिली, स्पार्क 400 ते 500 मिली आणि सेविन 400 ते 500 ग्रॅम एकरी फवारणी करावी.
कळी व फुलगळ थांबविण्यासाठी प्लॅनोफिक्स 50 मिली एकरी 200 लिटर पाण्यातून या प्रमाणात फुले लागल्यानंतर दोन वेळा 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर : याशिवाय काकडी पिकामध्ये फळे तडकणे, फुलगळ, फळगळ व फळे पोक राहणे इत्यादी विकृत्या पोषक अन्नद्रव्यांची कमतरता व असमतोलपणा यामुळे निर्माण होतात. म्हणून पिकांमध्ये अन्नद्रव्यांचा समतोलपणा निर्माण करण्यासाठी सेंद्रीय व रासायनिक खतांबरोबरच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविणे अतिशय महत्त्वाचे आहे. चिलेटेड स्वरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये ही पिकांना सहज व शंभर टक्के उपलब्ध होतात. जमिनीत साठून राहत नाहीत. वाया जात नाहीत. जमिनीचा पोत सुधारतो आणि उत्पन्नात 20 ते 25 टक्के वाढ होण्यास मदत होते. म्हणून काकडी पिकाला चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरणे अत्यंत गरजचे आहे.

लागवडीच्या वेळी शेणखत अर्धा ते एक टन आणि सुपरफॉस्फेट 100 किलो द्यावे. लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी (भर देताना) 10:26:26 किंवा 19:19:19 15 ते 200 किलो तसेच अॅग्रोमीन किंवा अॅग्रोमीन (मॅक्स) पाच किंवा दहा किलो द्यावे. तसेच बीजी फर्टिलायझर 10 किलो द्यावे. फळे लागल्यानंतर 19:19:19 किंवा 15:15:15 100 किलो आणि सल्फेट ऑफ पोटॅश 25 किलो द्यावे.
झाडांची वाढ, फुटवे आणि फुलकळीसाठी फवारणीवाटे खते देताना लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी अॅग्रोमीन (हायसोल किंवा मॅक्स) 500 किंवा 250 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे. एरीज टोटल 100 मिली 200 लिटर पाण्यातून फवारावे.
करपा, काळे ठिपके, गोजी (बोडक्या) येऊ नये म्हणून चिलेकॉप 100 ग्रॅम, प्लांटोमायसीन 100 ग्रॅमची 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी. तर व्हायरस, लालकोळी व भुरी येऊ नये म्हणून प्रायमासल्फ 500 मिली, प्लांटोमायसिन 100 ग्रॅम फवारणी 200 लिटर पाण्यातून करावी. फळावरील डाग व फळसड टाळण्यासाठी चेलाकॅल 200 ग्रॅम व प्लांटोमयसिन 100 ग्रॅमची 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा