‘बिपरजॉय’ चक्रीवादळ पुढील 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टी भागाला धोका आहे. तसेच या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना फटका बसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
चिंताजनक : एल-निनो सक्रिय झाल्याची वार्ता : यंदा दुष्काळ पडणार ?
या वादळाबाबत हवामान खात्यानेही अलर्ट जारी केला आहे. या काळात केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी भागात समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
पालघरसह कोकण किनारपट्टी भागात या चक्रीवादळाचा परिणाम दिसू शकतो. गुजरातलाही या चक्रीवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर लाटा उसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
मोठी बातमी : सोयाबीन, कापूस आणि तूरीच्या हमीभावात वाढ
तसेच या चक्रीवादळाच्या प्रभामुळे राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात तापमान वाढण्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या समुद्रकिनारी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, हवामान विभागाकडून मच्छिमारांना इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. वाढलेल्या तापमानामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहेत. नाशिक, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, सातारा, कोल्हापूर, पुण्याचे तापमान चाळीशीच्या जवळपास होते. तर जळगाव जिल्ह्यातील तापमान 40 अंशाच्या वर गेले आहे.
आनंदाची बातमी : यंदा 25 हजार शेतकऱ्यांना अनुदानातून मिळणार ट्रॅक्टर
दरम्यान, केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या पुढील प्रवास वेगाने सुरु असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03