गेल्या दोन वर्षात राज्यात पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला. अवेळी आणि दीर्घकाळ पडलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदाचा मान्सून कसा असणार ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले असताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मान्सूनबाबत समाधानकारक अंदाज जाहीर केला आहे.
ब्रिमेटो : एकाच झाडाला येणार टोमॅटो आणि वांगी
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनचे आगमन कधी होणार ? यंदा मान्सून कसा असणार ? खरीप हंगामातील पेरण्यासाठी मान्सून पोषक राहणार का ? असे अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या मते, यंदा राज्यात 8 जून 2023 रोजी आपल्या राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. विशेषत: यंदाचा मान्सून समाधानकारक राहणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जोमदार पाऊस राहणार आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या देखील वेळेतच होणार आहेत.
महत्त्वाची बातमी : राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे 26 कृषीरत्न पुरस्कार जाहीर
डख यांच्या मते, मान्सूनचे आगमन झाल्यानंतर 22 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून घेणार आहेत. म्हणजेच 22 जून अखेरपर्यंत राज्यात जवळपास सर्वत्र मान्सूनचा पहिला पाऊस पडणार आहे. त्यानंतर 27 जून पासून ते 30 जून पर्यंत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन पेरले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची खरीपची पेरणी जून महिन्यात पूर्ण होणार नाही त्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या पंधरवाड्यात पेरणी पूर्ण करता येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

डख यांच्या मते, यंदा जूनपासून ऑक्टोबरपर्यंत पाऊस वाढत जाणार आहे. जुनच्या तुलनेत जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये आणि ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात सर्वाधिक पाऊस राहणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय यंदा 26 ऑक्टोबरला थंडीला सुरुवात होईल असाही अंदाज त्यांनी बांधला आहे. तसेच यावर्षी दिवाळीमध्ये देखील गेल्यावर्षी प्रमाणे पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
फायद्याच्या टिप्स : उन्हाळ्यात शेळ्यांची अशी घ्या काळजी
चालू आठवड्यात 20 मेपर्यंत कोकण, विदर्भ, पूर्व विदर्भ या भागात पावसाची शक्यता डख यांनी व्यक्त केली असून, वातवरणात बदल होऊन काही भागात गरपीट दिखील होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र 21 मेपासून पुन्हा वातावरण हे कोरडे राहणार असल्याचा अंदाज त्यांनी आपल्या अंदाजात म्हटले आहे.
महत्त्वाची माहिती : उन्हाचा चटका वाढतोय ; अशी घ्या आरोग्याची काळजी !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1