हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आसना नदीला आलेल्या पुरामुळे कुरुंदा, किन्होळा, टाकळगाव, इंजनगाव, रुंज आदी गावांतील 400 ते 450 घरांमध्ये सुमारे पाच फूट पाणी शिरल्याचे कळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत कार्य करून संबंधित ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कुरुंदा तसेच परिसरातील गावांच्या शिवारातील जमिनी खरडून गेल्या असून सुमारे 15 हजार हेक्टरवरील खरीप पिके, फळपिके, भाजीपाला, बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
धक्कादायक बातमी : बीडमध्ये गोगलगायीमुळे पिकांचे मोठे नुकसान
लहान मोठी मिळून सुमारे शंभर जनावरे दगावली आहेत. शेकडो घरांची पडझड झाली आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पूरग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.
मुसळधार पावसामुळे आसना नदीला आलेल्या पुरामुळे कुरुंदा, किन्होळा, टाकळगाव, इंजनगाव, रुंज आदी गावांतील 400 ते 450 घरांमध्ये सुमारे पाच फूट पाणी शिरल्याचे कळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत कार्य करून संबंधित ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
महत्त्वाचा सल्ला : नैसर्गिक शेतीची लोकचळवळ यशस्वी ठरेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पूर परिस्थितीची माहिती मिळताच शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास वसमतचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी गावात जाऊन ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले. कोणतीही जीवित हानी झालेली नाही. परंतु प्राथमिक अंदाजानुसार 50 ते 60 जनावरे, 30 ते 35 शेळ्या दगावल्याची शक्यता आहे.
नुकसानीबाबतची माहिती घेण्यात येत आहे. संबंधित गावातील पाणी आता पूर्णपणे ओसरले आहे. टाकळगाव येथील दोन शेतकरी, इंजनगाव येथील दोन शेतकरी अशा एकूण चार शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या पथकाव्दारे बोटीमधून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
रुंज गावातील शेतात अडकलेल्या एका नागरिकांस सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
महत्त्वाची बातमी : राज्यात सर्वदूर पाऊस : मराठवाड्यात पिकांचे नुकसान
दरम्यान, आज या भागातील गावांमध्ये साथरोग पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने तातडीच्या उपाय योजना हाती घेतल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी यांनी गावात भेटी दिल्या. गावातील सर्व पाणीस्त्रोताचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सुचना दिल्या असून त्यानुसार कामाला सुरवात झाली आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात वाढीव औषधीसाठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.
आनंदाची बातमी : वायगाव हळदीचे टपाल विभाग करणार ब्रँडिंग
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1