महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर फळमाशीचा प्रादुर्भावर पहावयास मिळतो. गेल्या काही वर्षात अंतरराष्ट्रीय पातळीवर फळमाशीची दखल घेतली गेली आहे. कारण गेल्या काही वर्षात बहुतांश वेलवर्गीय पिकाबरोबच सर्व प्रकारच्या फळबागांमध्येही फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. पूर्वी ही फळमाशी खरीप आणि उन्हाळी हंगामात दिसून येत होती मात्र आता फळमाशी बाराही महिने दिसून येवू लागली आहे. विशेषत: बहुतांश वेलवर्गीय भाज्या आणि सर्व प्रकारच्या फळांमध्ये दिसून येवू लागला आहे.
जैविक नियंत्रण हा चांगला पर्याय : फळमाशी ही एक फळभाज्या किंवा फळे यांना लागणारी कीड आहे. विशेष म्हणजे हिची उत्पत्ती ही अतिशय झपाट्याने आणि फळांच्या आतमध्ये होते. त्यामुळे हिचे नियंत्रण करणे फार अवघड काम आहे. नेमका फळ अवस्थेमध्येच या किडीचा प्रादुर्भाव होतो. या किडीची अळी अवस्था फळाच्या आत असते. याच्या नियंत्रणासाठी फवारणी करावयाची ठरवली तर कीटकनाशकाच्या अंश फळाच्या आतपर्यंत पोहचू शकत नाही. शिवाय फवारणी केल्याने फळांमध्ये कीटकनाशकाचा अंश फळांमध्ये राहण्याची शक्यता असते. अशी फळे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे फळमाशीच्या नियंत्रणासाठी जैविक नियंत्रण हा चांगला पर्याय आहे.
महत्त्वाची माहिती : असे करावे कारल्यावरील कीड-रोगाचे नियंत्रण !
150 फळांवर उपद्रव : फळमाशीवर आजपर्यंत झालेल्या संशोधनानुसार भारतामध्ये फळमाशीच्या सुमारे 200 प्रजाती आढळून आल्या असून, त्यापैकी 5 ते 6 प्रजाती पिकांना थेट नुकसान पोचविणार्या आहेत. कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यात बॅक्ट्रोसेरा डॉर्सेलिस, बॅक्ट्रोसेरा झोनॅटा, बॅक्ट्रोसेरा करेक्टा व बॅक्ट्रोसेरा टाऊ या चार जाती आढळून आल्या आहेत. या केवळ पाच ते सहाच प्रजाती असल्या तरी देशात पिकणार्या सुमारे 150 फळांसाठी उपद्रवी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, वेगवेळ्या फळांची फळमाशी वेगवेगळ्या प्रकारची असते. यासाठी योग्य उपाययोजना केल्यास फळमाशीवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होते. मात्र यासाठी वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या गोष्ट : काकडीचे असे करा पीक संरक्षण
फळमाशीचा लक्षणे : फळमाशी सहज डोळ्यानेही दिसून येते. फळमाशीचा रंग पिवळसर सोनेरी असतो. ती आकाराने घर-माशीपेक्षा थोडी मोठी असते. फळमाशी फळाला छिद्र पाडते. आणि आत अंडी घालते. त्या छिद्रातून पातळ द्रव्य बाहेर येते. फळाच्या आत अंडी घातल्यानंतर काही दिवसांनी त्यातून अळ्या तयार होतात. फळमाशीच्या अळ्या फिकट पांढर्या रंगाच्या असतात. डोक्याकडे निमुळत्या असतात. फळाच्या आतमध्ये तयार झालेल्या अळ्या आतील गर खातात. आतमध्ये विष्टा सोडतात. त्यामुळे फळ सडते. सडलेले फळ लवकर पक्व होते आणि गळून पडते. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते. फळे वरून चांगली दिसत असली तरी आतमध्ये अळ्या दिसून येतात किंवा ते सडलेले असते.
फायद्याच्या टिप्स : भेंडीवरील किडींचे असे करा एकात्मिक व्यवस्थापन
फळमाशीचे जीवनचक्र : फळमाशीमध्ये प्रौढ नरमाशी व मादीमाशी यांचे मिलन होते. फळमाशीची एक मादी तिच्या जीवनकाळात फळामध्ये पुंजक्यात 500 ते 1000 अंडी देते. मादीमाशी मिलन झाल्यानंतर 5 ते 10 दिवसानंतर फळामध्ये अंडी घालते. अंडी घातल्यानंतर त्यातून 3 ते 10 दिवसांत पांढर्या रंगाच्या आणि डोक्याकडे निमुळत्या अशा अळ्या तयार होतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करतात. अशी फळे सडतात. फळे खाण्यायोग्य राहत नाहीत. अळी 11 ते 25 दिवसांनी कोषामध्ये रुपांतरीत होते. तर कोष अवस्था 8 ते 40 दिवसांची असते. प्रौढ माशी 4 ते 5 महिने जगते. अशा प्रकारे एका वर्षात फळमाशीच्या 8 ते 10 पिढ्या पूर्ण होतात. या विशिष्ठ जीवनचक्रामुळे फळमाशी कमी काळात मोठ्या प्रमाणात उत्पत्ती करते.
फायद्याचा लेख : वांगी पिकाचे असे करा एकात्मिक कीड नियंत्रण
नियंत्रणाचे उपाय : फळमाशी फळामध्ये अंडी घालण्यापूर्वी तीचा नाश करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी एकरी पाच ते सहा कामगंध सापळ्याचा वापर करावा. यामुळे नर आकर्षीत होऊन ते सापळ्यात मरून पडता. त्यामुळे मादी व नराचे मिलन होत नाही. परिणामी उत्पतीला अटकाव होतो. बागेतील खराब फळे गाळाकरून खोल खड्ड्यात गाडून टाकावीत. उन्हाळ्यात जमीन चांगली खोलवर नांगरून उन्हात तळून घ्यावी. 10 मिली मेटॉसीड, 700 ग्रॅम गुळे आणि तीन थेंब सीट्रॉनील ऑईल एकत्र करून घ्यावे. एका प्लॉस्टीकच्या डब्यात त्याचे चार थेंब टाकून त्या डब्याला दोन मिमीचे छिद्र पाडावी. यामध्ये किडीचे नर आकर्षित होऊन ते मरतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पाण्यात विरघळणारे कार्बारील 50 टक्के 40 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.
(संदर्भ : शेतीमित्र मासिक)
महत्त्वाची माहिती : वांग्यावरील रोगाचे सोप्या पद्धतीने करा; असे नियंत्रण
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1