शेतकऱ्यांसमोरील संकटाची मालिका सुरूच असून, आता शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अळीचे नवे संकट उभे राहिले आहे. या घोणस अळीचा परिणाम केवळ पिकावरच नाही तर माणसांवर देखील होताना पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. शिराळा गावात ही घोणस अळी चावल्याने शेतकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.
ब्रेकिंग न्यूज : ई-केवयसीसाठी पुन्हा मुदतवाढ !
वरचेवर होणाऱ्या वातावरणातील बदलांचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवर होत आहे. पिकांवर विविध प्रकारच्या किडी पडत आहेत. मात्र, घोणस नावाची एक अळी जी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. घोणस नावाची विषारी अळी अंगावर पडून तिने चावा घेतल्याने असह्य वेदना झाल्याने तीन शेतकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. हा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातील शिराळा गावात घडला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी दिली आहे.

याबाबत तालुका कृषी अधिकारी तरटे म्हणाले, ही अळी म्हणजे कोणत्याही पिकावरील किड नाही तर एक रानटी गवतावरील अळी आहे. जास्त प्रमाणात जर या अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर क्लोरोसायफर फवारने गरजेचे आहे. परंतू जास्त प्रमाणात प्रादुर्भाव नसेल तर काही फवारण्याची गरज नाही. मात्र, शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी म्हणून अळीपासून संरक्षण करण्यासाठी पूर्ण कपडे घालणे गरजेचे आहे. तसेच ही अळी शरीरावर येऊ नये याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केले आहे.
मोठी बातमी : नवीन कापसाला मिळाला चक्क एवढा भाव ?
याबाबत कीटकशास्त्र नेमकं काय म्हणातात….
दरम्यान, ही अळी जशी निर्माण होत आहे तशीच ती निघून ही जाईल. ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे मत लातूरचे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय भामरे यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांनी घोणस अळीला घाबरण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले, घोणस अळीचा प्रादुर्भाव हा ऊस, गवत, आंबा अशा विविध पिकांवर होताना दिसत आहे. या किड येत आणि निघून जाते. या अळीच्या शरीरावर केस असतात. या केसामधून एक प्रकारचे रसायन बाहेर पडते. ते विषारी असते. अशा प्रकराच्या बऱ्याच अळ्या असतात. पण काही अळ्या या विषारी रसायन बाहेर सोडत असतात. त्यामुळे जर आपण अशा अळीला स्पर्श केला किंवा त्या अळीच्या संपर्कात आपली त्वचा आली तर काही मिनीटातच त्या भागाची आग होते. जवजवळ दोन ते तीन दिवस याचा प्रभाव जाणवू शकतो. काही व्यक्तींमध्ये या रसायनाला अॅलर्जी गुणधर्म असतात, त्यामुळे अशा लोकांना या अळीचा त्रास होता. त्यामुळे ज्या ठिकाणी अशा अळ्या असतील तिला स्पर्श करु नका. अळीला बाहेर उचलून टाकायचे असेल तर ग्लब्ज वापरा आणि टाका अशी माहितीही डॉ. विजय भामरे यांनी दिली.
महत्त्वाच्या टिप्स : नारळाच्या व्यापारी शेतीसाठी ‘या’ आहेत महत्त्वाच्या 10 जाती !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1