खरीप हंगाम 2022-23 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी असून, योजना ऐच्छिक आहे, अधिसूचित पिकांसाठी खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे.
मोठी बातमी : दिल्लीत 10 हजार चंदनाची झाडे लावण्याचा नायब राज्यपालांचा फतवा
विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी खरीप हंगामासाठी विमा हप्ता दोन टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत विविध जोखमीच्या कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाणार आहे. ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी विमा योजनेत विमा घेतलेले पीक आणि ई-पीक पाहणीमध्ये नोंदविण्यात आलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद॒भवल्यास ई-पीक पाहणीमधील पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे.
रेड अलर्ट : राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
अधिक माहितीसाठी आय.सी.आय.सी.आय जनरल लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी, पुणे टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२, ई-मेल आयडी [email protected] वर ई-मेल करावे. या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, विविध कार्यकारी सोसायट्या, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अतिमहत्वाची बातमी : शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार : मुख्यमंत्री
ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी असून, योजना ऐच्छिक आहे, अधिसूचित पिकांसाठी खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे. विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी खरीप हंगामासाठी विमा हप्ता दोन टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
ब्रेकिंग न्यूज : राज्याला नवा कृषीमंत्री मिळण्याची शक्यता
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1