Onion Market : कांदा व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी

0
257

Onion Market : नाशिक जिल्ह्यात सलग 12 दिवसांपासून कांदा लिलाव बंद असून, लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख प्रकाश पाटील (Prakash Patil) यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

नक्की वाचा : कांदा व्यापारी मागण्यांवर ठाम : लिलाव बंदच !

नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने घेतलेल्या निर्णयानुसार त्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घ्यावा अथवा लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समित्यांना निर्देश (directives) द्यावेत, नवीन व्यापाऱ्यांना परवाने द्यावेत, यापैकी काहीही करा; पण निर्णय प्रलंबित ठेवू नका, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे.

कांदा व धान्य लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अनेक छोट्या-मोठ्या (small large commercial) व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसला आहे. बाजार समितीवर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.

मोठी बातमी : नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद !

एप्रिल आणि मेपासून चाळीत साठविलेला कांदा खराब होत असल्याने शेतकऱ्यांना तो कांदा विक्री करण्यासाठी अडचण येत आहे. प्रत्येकवेळी वेगवेगळे प्रश्न निर्माण करणाऱ्या मुजोर व्यापाऱ्यांचा शासकीय यंत्रणेकडून (government system) शोध घेवून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. अशा व्यापाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द करून त्यांना दिलेले प्लॉट, जागा, शेड व इतर सोयी-सुविधा काढून घ्याव्यात, अशी मागणी पाटील यांनी या पत्रात केली आहे.

व्यापारी वर्ग नेहमी लिलाव बंद ठेवून कृत्रिम टंचाई निर्माण करीत लिलाव बंद कालावधीत आपल्याकडील कांदा इतर बाजारपेठांत पाठवून नफा कमावतात. काही व्यापारी रतलाम, मध्य प्रदेशातूनही कांदा खरेदी करतात. फक्त आपल्या बाजार समितीला वेठीस धरत आहेत. अशा व्यापाऱ्यांची शासकीय यंत्रणेकडून सखोल चौकशी (In-depth investigation) करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. व्यापारी संचालकांनी लिलाव बंदमध्ये सहभाग घेतला असल्यास अशा व्यापारी संचालकांचे पद रद्द करण्याबाबत तत्काळ कारवाई (immediate action) करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात यावेत, अशीही मागणी प्रकाश पाटील यांनी केली आहे.

ब्रेकिंग : यंदा ऊस हंगाम वादात सापडण्याची चिन्हे

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here