कोण आहेत आपल्या जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी ? राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे २०१८-१९ चे पुरस्कार जाहीर

0
1556

राज्यात शेती आणि शेतीपुरक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या शेतकरी अथवा संस्थेस राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यासंदर्भात कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखली झालेल्या बैठकीत सन २०१८ व २०१९ या दोन वर्षाच्या विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावेळी दोन वर्षाचे १२२  विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. यावेळी बैठकीस सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री सुनिल केदार, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषि विस्तार संचालक विकास पाटील यावेळी उपस्थित होते.

शेती क्षेत्रातील सर्वोच्च अशा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील संजीव गणपतराव माने यांना २०१८ चा तर २०१९ चा बारामती तालुक्यातील पिंपळी येथील राजेंद्र दिनकरराव पवार व नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव येथील श्रीमती सुनंदा संतोषरावजी सालोटकर (जाधव) यांना जाहीर झाल्याची घोषणा कृषीमंत्र्यांनी केली.

२०१८ मध्ये ५८ शेतकऱ्यांना पुरस्कार

सन २०१८ व २०१९ साठीच्या पुरस्कारार्थींची नावे जाहीर करण्यात आली असून २०१८ मध्ये ५८ पुरस्कार आहेत. त्यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार एक, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार १०, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार १, वसंतराव नाईक शेतीमीत्र पुरस्कार ३, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २५, उद्यानपंडीत पुरस्कार ८, कृषीभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार ८, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार २ अशा एकूण ५८ शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत.

२०१९ मध्ये ६४ शेतकऱ्यांना पुरस्कार

सन २०१९ साठी काही पुरस्कारांमध्ये पुरस्कारार्थींची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार एक ऐवजी दोन जणांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार पाच जणांना तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार दोन ऐवजी तीन जणांना देण्याचा निर्णय झाला असून उर्वरित अन्य पुरस्कारांमध्ये पुरस्कारार्थींची संख्या समान असल्याने २०१९च्या पुरस्कारार्थींची संख्या ५८ वरुन ६४ झाली आहे.

वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार २०१८

विजय जगन्नाथ माळी (शिरगाव, ता. जि. पालघर), कारभारी महादू सांगळे (वडगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक), वाल्मीक आनंदराव पाटील (चांदे, ता. जि. नाशिक), गंगाराम धोंडू धिंदळे (शिरपुंजे, ता. अकोले, जि. नगर), रवी अशोक पाटील (अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली), जनार्दन संतराम अडसूळ (तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा), अप्पासाहेब पांडुरंग पाटील (सागाव, ता. कागल, जि. कोल्हापूर), दत्तात्रय महादेव जाधव (उदंडवडगाव, ता. जि. बीड), नानासाहेब शंकरराव गायके (सुलतानाबाद, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), तात्यासाहेब तुळशीराम गोरे (आंतरगाव, ता. भूम, जि. उस्मानाबाद).

जिजामाता कृषीभूषण पुरस्कार २०१८

सौ. प्राजक्ता गिरिधारी काळे (वहाणगाव, ता. मावळ, जि. पुणे)

कृषीभूषण (सेंद्रिय शेती) २०१८

अनिल वामन पाटील (माहिमरोड, पालघर, अनिल जीवराम सपकाळे (करंज, ता. जि. जळगाव), नागेश अर्जुन ननवरे (दारफळ, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर), अशोक गजानन चिवटे (किन्हई, ता. कोरेगाव, जि. सातारा), रायसिंग झेंडुसिंग सुंदरडे (राजेवाडी, ता. बदनापूर, जि. जालना), बाबासाहेब तात्याराव रनेर (बाभळगाव ता. पाथरी, जि. परभणी), राधेश्याम गोविंदराव मंत्री (पुसदनाका, ता. जि. वाशीम), तानाजी गोपाळ गायधने (चिखली, ता. जि. भंडारा)

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०१८

बालचंद कपूरचंद घुनावत (लाखेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद), मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे (चिलवडी, ता. जि. उस्मानाबाद), डॉ. प्रदीप चिंतामण सूर्यवंशी (वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर)

उद्यान पंडित पुरस्कार २०१८

शेखर शिवाजीराव विचारे (वरवेली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), सीताराम काळू चौधरी (मांगधे, ता. सुरगाणा, जि. नाशिक), किरण नवनाथ डोके (कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर), काकासाहेब रावसाहेब सावंत (अंतराळ, ता. जत, जि. सांगली), सुदाम नामदेव शिरवत (मुलानी वाडगाव, जि. औरंगाबाद), धोंडिराम इरवंत सुपारे (टाकळगाव, ता. हादगाव, जि. नांदेड), प्रफुल्ल गणपतराव हेलोडे (सिंभोरा, ता. मोर्शी, जि. अमरावती), निलकंठ विठ्ठलराव कोढे (घापेगाव, ता. कळमेश्‍वर, जि. नागपूर).

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०१८ (सर्वसाधारण गट)

मिलिंद दिनकर वैद्य (रिळ, ता. जि. रत्नागिरी), विनायक भास्कर पाटील (दलोंडेपाडा, ता. भिवंडी, जि. ठाणे), केशव तुकाराम देसले (वेहेळे, ता. कल्याण, जि. ठाणे), बबनराव धोंडिराम कांगणे (दोनवडे, ता. जि. नाशिक), नामदेवराव शिवाजीराव बस्ते (तळेगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक), भागवत विठोबा बलक (वडगाव, ता. सिंन्नर, जि. नाशिक), शंकर नारायण काळे (काळेावाडी, ता. पुरंदर, जि. पुणे), मुकुंद बबन ठाकर (येळसे, ता. वडगाव मावळ, जि. पुणे), विकास हरिभाऊ चव्हाण (पारगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), धोंडिराव खानगोंडा कतगर (सुळकुड, ता. कागल, जि. कोल्हापूर), दिलीप धोंडीराम चौगुले (अरपवडे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), निवृत्ती नामदेव डिडोरे (औरंगपूर, ता. जि. औरंगाबाद), श्रीमती सुचिता दत्तात्रय सिनगारे (खेडगाव, ता. अंबड, जि. जालना), चौरंगनाथ भीमराव वाघमोडे (शिराळा, ता. परंडा, जि. उस्मानाबाद), नागनाथ भगवंत पाटील (लिंबाळवाडी, ता. चाकूर, जि. लातूर), डॉ. शशिभूषण भाऊरावजी उमेकर (टेंभुरखेडा, ता. वरूड, जि. अमरावती), विनोद ज्ञानदेवराव इंगोले (धाकली, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला), विष्णू रामभाऊ आथिलकर (नेरी, ता. मोहाडी, जि. भंडारा), ऋषिकुमार युवराज टेंभरे (चुटिया, ता. जि. गोंदिया).

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०१८ (आदिवासी गट)

तानाजी जानू गावंडा (चिंचनली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे), गंगाधर धाऊ वाख (घरटन ता. शहापूर, जि. ठाणे), श्यामराव काशिनाथ गांवढे (गावंडपाडा, ता. पेठ, जि. नाशिक), कुमारसिंग थावर्‍या पवार (बोराडी, ता. शिरपूर, जि. धुळे), कांताराम लुमाजी लोहकरे (तेरुंगन, ता. आंबेगाव, जि. पुणे), अन्नस्वामी रामथभाऊ कोडापे (जामगड, ता. उमरेड, जि. नागपूर).

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषीसेवारत्न पुरस्कार २०१८

सुनील रघुनाथ लांडगे (मंडळ कृषी अधिकारी, ता. हवेली, जि. पुणे), वसंत यशवंतराव कातबने (कृषी सहाय्यक, ता. पैठण, जि. औरंगाबाद)

वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार २०१९

विनायक रघुनाथ बारी (कंक्राणी, ता. डहाणू, जि. पालघर), नरेंद्र रावसाहेब भदाणे (सामोडे, ता. साक्री, जि. धुळे), जनार्दन जोती काटकर (वडजल, ता. माण, जि. सातारा), सुनील आनंदराव माने (आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली), सिकंदर कडुबा जाधव (जळगाव फेरण, ता. जि. औरंगाबाद), किसन भुर्‍या कासदेकर (बारू, ता. धारणी, जि. अमरावती), सतीश विठ्ठलराव खडके (वाघोली, ता. जि. उस्मानाबाद), दिलीप नामदेव शेंडे (मेंढा, ता. सिंदेवाही, जि. नागपूर). बळवंत सदाशिव डडमल (मांडवा, ता. हिंगणा, जि. नागपूर), जितेंद्र चंद्रकांत बिडवई (गोळेगाव, ता. जुन्नर, जि. पुणे).

जिजामाता कृषीभूषण पुरस्कार २०१९

सौ. संगीता वाल्मीक सांगळे (सत्तेगाव, ता. येवला, जि. नाशिक), सौ. सुनीता रामभाऊ खेमनार (साकुरी, ता. मालेगाव, जि. नाशिक), श्रीमती मेघा विलासराव देशमुख (जरी, ता. जि. परभणी), सौ. आशा शिवाजी खलाटे (कांबळेश्‍वर, ता. बारामती, जि. पुणे), सौ. प्रतीभा प्रभाकर चौधरी (नवेगाव, ता. जि. गडचिरोली).

कृषीभूषण (सेंद्रिय शेती) २०१९

मिनेश मोहन गाडगीळ (गुळसुंदे, ता. पनवेल, जि. रायगड), यशवंत महादू गावंडे (गावंधपाडा, ता. पेठ, जि. नाशिक), दादासाहेब नामदेव पाटील (बिटरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), सचिन तानाजी येवले (पडवळवाडी, ता. वाळवा, जि. सांगली), अजय प्रकाश जाधव (खेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद), भगवान रामजी इंगोले (मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड), प्रल्हाद संपत गवते (मंगरूळ, ता. चिखली, जि. बुलडाणा), सुनील मारोतवार कोंडे (सावंगी तोमर, ता. कळमेश्‍वर, जि. नागपूर).

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०१९

गोपाल जगन्नाथराव हागे (केशवनगर, जि. अकोला). सौ. श्रद्धा सुनील कासोडे (पाथर्डीफाटा, ता. जि. नाशिक), राजकुमार बापूसो चौगुले (दानोळी, ता. शिरूर, जि. कोल्हापूर).

उद्यान पंडित पुरस्कार २०१९

रामचंद्र रावजी कदम (बोरस, ता. पोलादपूर, जि. रायगड), बाळासाहेब कडू देवरे (वाजगाव, ता. देवळा, जि. नाशिक), राहुल अमृता रसाळ (निघोज, ता. पारनेर, जि. नगर), रामकृष्ण ज्ञानदेव वरुडे (निमसोड, ता. खटाव, जि. सातारा), अभयकुमार बाजीराव काळुंके (रायपूर, ता. परतूर, जि. जालना), प्रताप किसनराव काळे (धानोरा काळे, ता. पूर्णा, जि. परभणी). जगदीश हरिदास चव्हाण (गाजीपूर, ता. दारव्हा, जि. यवतमाळ), ज्ञानेश्‍वर दौलत बनसिंगे (कोछी, ता. सावनेर, जि. नागपूर).

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार २०१९  (सर्वसाधारण गट)

रुपेश दशरथ चोरगे (गोवेली, ता. कल्याण, जि. ठाणे), शिवप्रसाद काशिनाथ देसाई (बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), शरद प्रकाश पवार (पढावद, ता. शिंदखेडा, जि. धुळे), विनोद कृष्णा जाधव (सातमाने, ता. मालेगाव, जि. नाशिक), एकनाथ शंकर चव्हाण (जुने निरपूर, ता. बागलाण, जि. नाशिक), सौ. मंगल मारुती दळवी (येळसे, ता. मावळ, जि. पुणे), भानुदास माती दरेकर (पापळवाडी, ता. खेड, जि. पुणे), धनंजय भिकू चव्हाण (म्हसवे, ता. जि. सातारा), महादेव हिंदुराव पाटील (जाफळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), प्रशांत श्रीधर लटपटे (सावळवाडी, ता. मिरज, जि. सांगली). आण्णासाहेब अर्जुनराव जगताप (सावरगाव, ता. माजलगाव, जि. बीड), अंबादास सखाराम बनसोड (भावडा, ता. जि. औरंगाबाद), दत्तात्रेय नामदेवराव कदम (दहामदरी, ता. अर्धापूर, जि. नांदेड), देवराव अबाजी शिंदे (मुरसूल, ता. पुर्णा, जि. परभणी), सौ. सरा रमेश मोहिते (नवीन सोनखास, ता. मंगरूळपीर, जि. वाशीम), सौ. अनिता रावसिंग पवार (मलगी, ता. चिखली, जि. बुलडाणा), प्रवीण देवदा कापगते (सिंदीपार, ता. सडकसर्जुनी, जि. गोंदीया), डुलीचंद नारायण पटले (बिहिरिया, ता. तिरोडा, जि. गोंदीया), घनशाम बळीराम पारधी (किन्ही ता. साकुली, जि. भंडारा).

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०१९ (आदिवासी गट)

नितीन मधुसूदन गवळी (पायगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे), श्रीमती राजूबाई गुणाजी वाघे (अंबर्जे ता. शहापूर, जि. ठाणे), सीताराम अर्जुन हाडस (दुर्गापूर, ता. सुरगाणा, जि. नाशिक), शांतारामभाऊ वारे (ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे), महेंद्र दौलत नैताम (खैरगाव, ता. केळापूर, जि. यवतमाळ), गुरुदास अर्जुन मसराम (पांढरवाणी, ता. शिंदेवाही, जि. चंद्रपूर).

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषीसेवारत्न पुरस्कार २०१९ (अधिकारी संवर्ग)

उदय अण्णासाहेब देशमुख (मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय), श्रीमती क्रांती रवींद्र चौधरी मोरे (कृषई अधिकारी, ता. उरण, जि. रायगड).

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषीसेवारत्न पुरस्कार २०१९ (कर्मचारी संवर्ग)

कृषी पर्यवरेक्षक दिलीप गोविंद दोरगे (विभागीय कृषी सहसंचकलक कार्यालय)

पुढील वर्षापासून युवा शेतकरी पुरस्कार

शेती क्षेत्राशी संबधित डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडीत पुरस्कार, कृषीभूषण (सेंद्रिय शेती) व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादि पुरस्कारांने प्रगतीशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते. पुढील वर्षापासून ‘युवा शेतकरी’, कृषी शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ पुरस्कार नव्याने सुरु करण्यात आल्याचे सांगुन आता पुरस्कारांची संख्या ६३ ऐवजी ९९ इतकी केली असल्याचे व पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल केले असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान होणार

आर्थिक व कृषी हवामान परिस्थिती अडचणीची असून देखील काही शेतकरी आपल्यापरीने नवीन प्रयोग व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून परीसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक होईल असे काम करीत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या बाबत कृषि विभागाने स्वत: पुढाकार घेऊन संबंधित शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पुरस्काराचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावेत. या कामी तालुका कृषी अधिकारी यांच्यावर तालुक्यातील प्रस्ताव तयार करण्याची विशेष जबाबदारी देणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

शेतीमित्र मासिक आता.. शेतकर्‍यांच्या मोबाईलवर ! शेतीविषयक आधुनिक माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी #शेतीमित्र मासिकाचे फेसबुक पेज लाईक करा !

Click to rate this post!
[Total: 5 Average: 4.4]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here