हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. याची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.
ब्रेकिंग न्यूज : कोल्हापूर सांगलीला अलमट्टीचा वाढता धोका ?
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील माझोड येथील दशरथ गजानन मुळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मात्र ही तक्रार कशासाठी दाखल केली आहे, यावरून याची चांगलीच चर्चा सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत वीज बिलासाठी शेतकऱ्यांची वीज तोडू नये, अशा सूचना देऊनही माझी वीज तोडण्यात आल्याचा आरोप मुळे यांनी केला गेला आहे.
ज्या भागात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचे नुकसान झाले, अशा भागात वीज पुरवठा खंडित करू नये व सक्तीची वीज बिल वसुली करू नये, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती, तरीही वीज वितरण कंपनीने माझा वीज पुरवठा खंडित केला. माझीच नव्हे, इतर अनेकांची वीज तोडली असल्याचा आरोप मुळे यांनी तक्रारीत केला आहे. मला अतिवृष्टीच्या मदतीची मिळालेली रक्कम बिलापोटी भरावी लागली. यासाठी महावितरणने दादागिरीची भूमिका घेतली होती. यातून उपमुख्यमंत्री खोटे बोलल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर अन्यथा महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे गोरेगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत मुळे यांनी म्हटले आहे.
मोठी बातमी : खतांच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ
यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे. शेतकरी रब्बीची लागवड करत असतानाच महावितरणकडून थकीत वीज बिलसाठी थेट वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. चालू महिन्याचे बिल भरलेल्या अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट न करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले होते. मात्र त्यांचे आदेश पाळले जात नाहीत, यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
मोठा निर्णय : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देणार : उपमुख्यमंत्री फडणवीस
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1