दिल्लीचे नायब राज्यपाल वी के सक्सेना यांनी देशाच्या राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीमध्ये 10 हजार चंदनाची झाडे लावण्याचे फर्मान त्यांनी सोडले आहे. तसा लेखी आदेशच त्यांनी जारी केला आहे. त्यानुसार दिल्लीतील बागा, उद्याने आणि खुल्या जागेवर चंदनाची झाडे लावण्यात येणार आहेत.
चंदनाच्या लागवडीतून सरकारी जमिनीवरही उत्पन्न मिळेल. तसेच शहरातील जमीनधारक आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक संपत्ती निर्माण होईल, असा दावा त्यांनी केला आहे. चंदनाचे झाड 12 ते 15 वर्षात विकण्यायोग्य होते. त्याला 12 ते 15 लाख रुपये प्रति झाड असा दर मिळतो, असे दावे सक्सेना यांनी केले आहेत. त्यांच्या मते 10 हजार चंदनाच्या झाडांपासून 12 ते 15 हजार कोटीचे उत्पन्न मिळू शकेल.
रेड अलर्ट : राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
वी के सक्सेना पूर्वी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी नाशिक, वाराणसी, गांधी नगर आणि दिल्लीच्या काही भागातही चंदन लागवडीचे प्रयोग केले होते. तेव्हापासून सक्सेना जणू चंदनाच्या झाडाच्या प्रेमात पडले आहेत.

चंदनाच्या झाडाच्या पोषणासाठी दिल्ली किंवा इतर शहरात पोषक वातावरण नाही असे सांगितले जाते. मात्र राजघाटवर लावण्यात आलेल्या चंदनाची झाडे एक वर्षात 9 ते 10 फूट इतकी उंचीचे झालेत. त्यामुळे दिल्लीमधील शेतकऱ्यांनी प्रत्येकी कमीत कमी चार चंदनाचे झाडांची लागवड करवी, असे आवाहनही सक्सेना यांनी केले आहे.
अतिमहत्वाची बातमी : शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार : मुख्यमंत्री
पर्यावरणतज्ज्ञांच्या मते मात्र दिल्लीतील भौगोलिक परिस्थिती आणि हवामान लक्षात घेता येथे चंदन लागवडीचा सल्ला देणे अशास्त्रीय ठरेल. दिल्लीमध्ये चंदनाच्या झाडांना पोषक वातावरण नाही. लागवडीनंतर ही झाडे उगवून येतील, परंतु त्यातून आर्थिक उत्पन्न मिळणार नाही. कारण त्यांची पुरेशी वाढ होणार नाही, तर शास्त्रज्ञांच्या मते, चंदनाच्या झाडासाठी जोरदार पाऊस आणि चांगला निचरा होणारी जमीन लागते. दिल्लीत या गोष्टींचा अभाव असल्याने चंदन लागवड फायदेशीर ठरणार नाही, असं जाणकार सांगतात.
ब्रेकिंग न्यूज : राज्याला नवा कृषीमंत्री मिळण्याची शक्यता
चंदनाची झाडे यमुना पट्ट्यात किंवा अरवली प्रदेशात वाढू शकत नाहीत. कारण त्यांना पोषक वातावरण तिथे मिळत नाही. चंदनाचे झाड अर्ध-परजीवी आहे. ते पोषणासाठी इतर झाडांवर अवलंबून असते. त्यामुळे दिल्लीतील वातावरणात चंदनाचे झाड तग धरू शकत नाही. असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.

नायब राज्यपालांना मात्र चंदन लागवड हा स्वयंपूर्णतेकडे जाण्याचा मार्ग वाटतोय. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीमध्ये चंदन लागवडीमुळे व्यावसायिक फायदेही होतील. चंदनाचे उत्पादन वाढल्यास चंदनाच्या झाडाचे तेल आणि पावडर यांच्या आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही, असे नायब राज्यपालांचे मत आहे.
हे नक्की वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतीच्या कामाशी नाळ कायम

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1