मेघालयातील एका व्यक्तीने मोठ्या कल्पकतेतून महिंद्रा ट्रॅक्टरला थार जीपचा लूक दिला आहे. त्याच्या या देशी जुगाडाचे चक्क महिद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले असून, त्यांनी ट्विट करून हा फोटो शेअर केला आहे.

महिंद्रा ही देशातील नंबर एक कंपनीपैकी असून महिद्रा कंपनीच्या बनावटीच्या मशिन्स देशात नव्हे तर परदेशातही वापरल्या जातात. त्याकंपनीचे चेअरमन आहेत. आनंद महिंद्रा त्यांनी या ट्रॅक्टरच्या देशी जुगाडाचे कौतुक केले आहे. त्यानी आपल्या पोस्टमध्ये या ट्रॅक्टरच्या जीप लूकचा आविष्कार पाहून त्या बद्दल म्हटले आहे की, ट्रॅक्टरचा हा नवा लूक त्यांना डिस्नेच्या अॅनिमेटेड एका गोंडस पात्राची आठवणकन देतो. के पाहून तुम्हा सगळ्यांनाही ते पात्र आठवलं का ? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
हेही वाचा
गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी या बाबी लक्षात घ्या !
स्मार्ट शेतसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचविले हे सात मार्ग
विदर्भातील सफेद मुसळी, पानपिंपळीला मिळणार भौगोलिक मानांकन
एफआरपी निर्णयाविरुद्ध सदाभाऊ खोत यांचे 27 पासून आंदोलन
वास्तविक, जीपचा हा सर्वोत्तम फोडो महिंद्रा ट्रॅक्टर नावाच्या ट्विटर हँडलने शेअर केला आहे. जीप दिसणार्या या ट्रॅक्टरला सोश मिडीयावर चांगलीच पसंती मिळत आहे. देशातील ट्रॅक्टरचा हा जीप लूक दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असून तो लोकांना आवडला आहे. काहींनी याला एक मजबूत आणि शक्तिशाली ट्रॅक्टर म्हटले आहे तर काहींनी याला जीप ट्रॅक्टर असेही म्हटले आहे. देशी जुगाडातून हा जीप ट्रॅक्टर तयार करणार्याचे नाव पुढे आले नसले तरी ज्यांनी हा जीप ट्रॅक्टर बनविला आहे; त्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा