परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने देशी कापसाचा पीए 837 हा सरळ वाण विकसित केला आहे. या नवीन वाणास भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) मान्यता दिली आहे. हा वाण रसशोषक किडी व दहीया रोगास सहनशील असून, दक्षिण भारत विभागाकरिता प्रसारित करण्यात आला आहे. हा वाण काही चाचण्यांनंतर लवकरच महाराष्ट्रात देखील प्रसारित केला जाणार आहे.
देशात 1950 पासून संपूर्ण देशी कापसाची लागवड होत असली तरी देशी कापसामध्ये धाग्याची गुणवत्ता आणि कमी उत्पादकता या समस्या होत्या. त्यामुळे कापसाच्या अमेरिकी संकरित जाती आणि मागील दोन दशकांपासून संकरित बीटी जातींची लागवड होऊ लागली आहे. थोड्याच दिवसात बहुतांश क्षेत्र बीटी कापसाच्या लागवडीखाली आले. आणि देशी कापसाचे क्षेत्र नाममात्र उरले.
हे नक्की वाचा : राज्यातील आठ मिश्र खत उत्पादकांना नोटीसा
परंतु वर्षानुवर्षे बीटी कापसाची लागवड केल्यानंतर आता त्याची परिणामकारकता कमी झाली आहे. त्यामुळे बीटी कापसावरही बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. बीटी कापसाचा वाढता उत्पादन खर्च आणि घटत्या उत्पादकतेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना हे पीक आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरताना दिसत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी पुन्हा देशी कापसाचा पर्याय शोधत आहेत.
कापसाच्या देशी वाणांवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होत नाही. तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. देशी वाणांचा खर्च बीटीच्या तुलनेत कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे देशी तसेच सरळ वाण हा कमी कालावधीचा आहे. त्यामुळे कापसाचा नवीन देशी व सरळ वाण विकसित करण्यावर सरकारी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठांनी भर दिला आहे. कापसाच्या धाग्याची लांबी, मजबुती, तलमता तसेच पिकाची उत्पादकता यामध्ये देशी वाण सरस कसे ठरतील यावर संशोधन केले जात आहे.
मान्सून अपडेट : जुलै महिन्यात गेल्या 10 वर्षातील विक्रमी पावसाची नोंद
परभणी येथील कापूस संशोधन केंद्र हे कापसाच्या देशी वाणावर संशोधन करणारे देशातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राने यापुर्वी पीए – 740, 812, 810, 528, 08, 255, 402 आणि 785 हे देशी वाण विकसित केले आहेत. या नव्या देशी वाणांची उत्पादकता आणि कापसाची प्रत बीटीच्या तुलनेत कुठेच कमी नाही. उलट काही वाण तर बीटीपेक्षा सरस आहेत.
महाराष्ट्रात एकूण कापूस लागवडीपैकी 98 टक्के क्षेत्र बीटी वाणांनी व्यापलेले आहे. त्यामुळे देशी कपसाच्या वाणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. म्हणून परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने दक्षिण भारत विभागाकरिता देशी कापसाचे पीए 837 हे सरळ वाण विकसित केला आहे.
ही आहेत पीए ८३७ या सरळ वाणाची वौशिष्ट्ये : या वाणाचे उत्पादन हेक्टरी 15 ते 16 क्विंटल मिळते. याच्या धाग्याची लांबी 28 मिली मिटर तर तलमपणा 4.8 आहे. हा वाण रसशोषक किडी, कडा करपा आणि दहीया रोगास सहनशील आहे. याचा परिपक्व होण्याचा कालावधी 150 ते 160 दिवसाचा आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात या वाणाचे उत्पादन चांगले मिळाले आहे. लवकरच हे वाण काही चाचण्यांनंतर महाराष्ट्रात देखील प्रसारित केले जाणार आहे. देशी कापसाचे बी पुढे चार वर्ष बियाणे म्हणून वापरता येते. शिवाय कोरडवाहू पद्धतीने कमी पाण्यात उत्पादन घेता येते.
आनंदाची बातमी : गोकुळ संघाकडून दूध खरेदी दरात वाढ
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ