कापूस हे महाराष्ट्रातल्या प्रमुख नगदी पीक आहे. मागच्या वर्षाचा हंगाम संपताना कापसाला 14 हजारांवर भाव मिळाला होता. यंदाही कापसाला चांगला भाव मिळाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काल नवीन कापसाला 16 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
महत्त्वाच्या टिप्स : नारळाच्या व्यापारी शेतीसाठी ‘या’ आहेत महत्त्वाच्या 10 जाती !
यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगली मागणी आहे. यंदा कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि निसर्गाची साथ यामुळे महाराष्ट्रात यंदा कापसाला चांगला भाव मिळणार असे वाटत असताना काल जळगाव जिल्ह्यात कापसला चांगला भाव मिळाला आहे. दरम्यान, हरियाणा राज्यातील पालवाल जिल्ह्यात हंगामाच्या सुरुवातीलाच नव्या कापसाला 10 हजार रुपयांचा दर मिळाला आहे.

यंदा भारतात कापूस लागवड 6.65 टक्क्यांनी वाढली आहे. देशात नवीन कापूस साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मार्केटमध्ये येतो. सध्या 500 गाठींपेक्षा कमी कापूस बाजारात दाखल झाला आहे. यावेळी मात्र ऑगस्टमध्ये कापसाचे भाव आठ टक्क्यांनी वाढले आहेत. भविष्यात कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भविष्यात कापसाचा भाव 45 हजार ते 47 हजार रुपये प्रति गाठी असेल असे तज्ज्ञांचे मत आहे.
मोठी घोषणा : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वंकष धोरण निर्माण करणार : कृषीमंत्री अब्दुल सत्तार
दरम्यान, जळगाव मधील बोदवड येथे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापसाला 16 हजार रुपये हा विक्रमी भाव दिला आहे. तसेच सातगाव, डोंगरी, पाचोरा येथे कापसाला 14,772 रुपये प्रति क्विंटल चा भाव मिळाला आहे. तर जळगावमध्ये देखील कापसाला 16 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. धरणगाव येथे 11155 तर काजगाव येथे 11000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
पहिल्याच दिवशी 1 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यंदा सुरुवातीलाच 16 हजार प्रति क्विंटल भाव मिळाल्यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मोठी मागणी असल्यामुळे भावात अजून तेजी येऊ शकते असे मत व्यापारी वर्गामधून व्यक्त होत आहे.
आनंदाची बातमी : गौरी-गणपतीमुळे फुल बाजार वधारला

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1