राज्यातील 18 जिल्ह्यांतील 1166 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडीसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आला आहे. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.
महत्त्वाची बातमी : गणेश विसर्जनावर पावसाचे सावट : चार दिवस पाऊस
या संदर्भात माहिती देताना राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1166 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाला असून, संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे.
यासाठी मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.
मोठी बातमी : राज्यातील बाजार समित्यांचा निवडणूका जाहीर
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा, अमरावती, वाशीम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणूक होणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. पालघर जिल्ह्यातील डहाणू- 62, विक्रमगड- 36, जव्हार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70. रायगड जिल्ह्यातील अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग- 2 व देवगड- 2.
महा ब्रेकिंग न्यूज : वीज दरात पुन्हा वाढ होणार : शिंदे सरकारचा झटका
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.
पुणे जिल्ह्यातील मुळशी- 1 व मावळ- 1. सातारा जिल्ह्यातील जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6. कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1.
महत्त्वाच्या टिप्स : जनावरांमधील घातक लम्पी स्कीन रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा- 1. वाशीम जिल्ह्यातील वाशीम- 1. नागपूर जिल्ह्यातील रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8. वर्धा जिल्ह्यातील वर्धा- 2 व आर्वी- 7. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1. भंडारा जिल्ह्यातील तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1. गोंदिया जिल्ह्यातील देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2. तर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1. अशा एकूण- 1,166 ग्रामपंचायतींच्या निवडणूक होणार आहेत.
ब्रेकिंग : जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा 12 जिल्ह्यात फैलाव
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1