Sericulture : विभागीय आयुक्तांनी केली रेशीम शेतीची पाहणी

0
363

Agricultural industries : जालना जिल्हयातील शेती पध्दतीमध्ये रेशीम शेती (Sericulture) निश्चितपणे क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन राज्याचे विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) मधुकरराजे अर्दड यांनी केले. त्यांनी काल घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथे यशस्वी रेशीम शेतीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

मोठी बातमी : तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा !

त्यांनी निपाणी पिंपळगाव येथील युवा शेतकरी सोमेश्वर डिगांबर वैद्य आणि नामदेव भीमराव माने यांच्या रेशीम शेतीची विभागीय आयुक्तांनी पाहणी करुन त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या समवेत रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय कृषि अधिकारी सखाराम पवळ उपस्थित होते.

जालना जिल्हयास रेशीम कपडा निर्मिती करण्यासही चांगली संधी असल्राचे सांगून विभागीय आयुक्त अर्दड म्हणाले, कमी कालावधीत शाश्वत उत्पादन (Sustainable Production) देणाऱ्या रेशीम शेतीकडे जालना जिल्हयातील  शेतकरी मोठया प्रमाणात वळले आहेत. त्यामुळे रेशीम शेतीमुळे जालना जिल्हयातील शेती पध्दतीत निश्चितपणे क्रांती घडून येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते म्हणाले, रेशीम शेतीत शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतातच रोजगार मिळण्याबरोबरच चांगले उत्पादनही मिळत आहे, हे शेतकरी सोमेश्वर वैद्य यांच्या रेशीम शेतीमधील उत्पादन पाहता दिसून येते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन तुती लागवड (Mulberry Cultivation), कोष उत्पादन, किटक संगोपन गृह उभारणी इत्यादीकरीता प्रति एकर 3 लाख 58 हजार 515 रूपयाचे अनुदानही देण्यात येते, एच शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ब्रेकिंग : राज्यातील शेतकऱ्यांकडून पीक विम्यासाठी 1 कोटी 69 लाख अर्ज दाखल

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले, रेशीम अंडीपुज निर्मितीपासून ते रेशीम धागा निर्मितीपर्यंतच्या सर्व प्रक्रीया उपलब्ध असणारा जालना हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. जालन्याच्या रेशीम कोष बाजारपेठेत राज्यातील सर्व जिल्हयांतून शेतकरी रेशीम कोष विक्री करण्यासाठी आणतात. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन जालना जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करून रेशीम उद्योगास (Silk industries) सुरूवात करावी व आर्थिक समृध्दी प्राप्त करून घ्यावी, यासाठी प्रशासन सर्वतोपरी शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे अश्वासन त्यांनी यावेळी दिले.  

यावेळी रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी रेशीम उद्योग योजना व फायदे याविषयी माहिती दिली. यावेळी पाहणीदरम्यान निपाणी पिंपळगावचे सरपंच प्रतिभा प्रदिप बिरनावळे, रवना गावचे सरपंच संभाजी देशमुख, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, ग्रामसेवक ज्ञानेश्वर सोनवणे, वरीष्ठ क्षेत्र सहाय्यक रेशीम एस. आर. जगताप, कंत्राटी तांत्रिक अधिकारी मनरेगा अनिरूध्द धांडे आदी उपस्थित होते.

मोठी घोषणा : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना मिळणार 25 लाख रूपये  

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here