मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे; मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही या पिकाच्या योग्य वाढीसाठी २५ ते ३० अंश से तापमान चांगले असते ; परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ अंश से.) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो. ३५ अंश से. पेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते. परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते. विशेषत: मका पिकावर हल्ली लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्याच बरोबर मका या पिकावर खोडकिडा, कणसातील अळी आणि नाकतोड्याचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. याचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घेत येते. त्यामुळे याच्या नियंत्रणासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात सगळीकडे मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुषंगाने लष्करी आळी चे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
लष्करी आळी चे व्यवस्थापन : मका पिका भवती नेपिअर गवताच्या तीन ते चार ओळी लावावे. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टिन 1500 पी पी एम 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वेळेवर खुरपणी व कोळपणी करून शेत तणमुक्त ठेवावे. अंडीपुंज, समूहातील लहान अळ्या आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावा. मक्या वरील लष्करी अळी च्या सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळ्यांचा वापर आणि प्रत्यक्ष शेताचे निरीक्षण करावे. मक्या वरील लष्करी अळी च्या सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळ्यांचा वापर आणि प्रत्यक्ष शेताचे निरीक्षण करावे.
सामूहिकरीत्या मोठ्याप्रमाणात नर पतंग आकर्षित करून मारावे. यासाठी पंधरा कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत. तसेच प्रकाश सापळे लावावेत. केळीचे नैसर्गिक शत्रू जसे परभक्षी व परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलोनेमस, केम्पोलेटीस) यांचे संवर्धन करावे. त्यासाठी आंतरपिके व शोभिवंत फुलांची झाडे लावावी. ट्रायकोग्रामा किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवी ग्रस्त पन्नास हजार अंडी प्रतिएकर एक आठवड्याच्या अंतराने तीन वेळा किंवा कामगंध सापळा मध्ये तीन पतंग सापळा आढळून आल्यास शेतात सोडावेत. रोप आवस्था ते सुरुवातीची पोंग्याच्या अवस्था या कालावधीत पाच टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आणि शेवटी 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त कणसे आढळून आल्यास उपयुक्त बुरशी व जिवाणू जन्य किटकनाशकांची फवारणी करावी.
फवारणीसाठी कीटकनाशके : झाड जर पाच टक्के प्रादुर्भावग्रस्त असेल तर निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिन 1500 पी पी एम, स्पाईनोटोरम 11 टक्के एस सी. झाड जर 10 ते 20% प्रादुर्भावग्रस्त असेल तर थायमेथॉक्झाम 12.6 टक्के+ लैमडा सायक्लोथ्रीन 9.5 टक्के झेड सी किंवा क्लोरेनट्रानीलिप्रोल 18.5 टक्के एससी
रासायनिक कीटकनाशकांची फवारणी चारा पिकावर करू नये. एकाच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करू नये. तुऱ्यची अवस्था व त्यानंतर फवारणी टाळावी. फवारणी करतांना मजूर आणि सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी. एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे.
या बरोबरच मका पिकावर खोडकिडा, कणसातील अळी, गवती नाकतोडे यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्याच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करावी.
खोडकिडा : मका पिकाचे जैविक नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस ह्या मित्रकिडी 1.5 लाखप्रतिहेक्टरी याप्रमाणात उगवणीनंतर दोन आठवड्यानी सुरवात करून दर 10 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 वेळा पिकावर सोडावेत. याशिवाय या किडीचा प्रादुर्भाव वाढता असल्यास पिक सुमारे 30 दिवसाचे झाल्यानंतर एन्डोसल्फॉन 4 टक्के दानेदार किंवा कार्बोफ्युरॉन 3 टक्के दाणेदार हेक्टरी 10 किलो या प्रमाणात झाडाच्या पोंग्यात टाकावी. किंवा अवश्यकता भासल्यास एन्डोसल्फॉन 35 टक्के प्रवाही 14 मिली 10 लिटर पाण्यात मिसळुन पिकावर फवारणी करावी.
कणसातील अळी : या किडीचे पंतग मध्यम आकाराचे मळकट पिवळे, करड्या पिंगट रंगाचे असतात. त्यांची लांबी साधारणपणे 19 मि. मी इतकी असते. या किडीची अळी हिरव्या रंगाची असुन जवळपास 38 ते 50 मि. मि. लांब असते. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या कणसामध्या जाउन वाढणा-या दाण्यावर उपजिवीका करतात. त्यामपळे उत्पनावर परीणाम होतो.
मादी पतंग कमसाच्या स्त्रिकेशरावर आपली अंडी घालतात. एक मादी सुमारे 350 अंडी किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालु य़शकते. अंड्यातुन 4 – 5 दिवसात बरूक अळ्या बाहेर येतात. अळीची पुर्ण वाढ कणसामध्ये 15 ते 35 दिवसात होते. नंतर अळ्या जमिणीत कोषावस्थेत जातात. कोषावस्था साधारणपणे हवामाणानुसार 10 तो 25 दिवस टिकते. नंतर त्यातुन पतंग बाहेर येतात. या किडीचा बंदबस्त करण्यासाटी कणसातुन दोरेबाहेर द्सताच (स्त्रिकेशर) एक किंवा दोन वेळा कार्बारील 10 टक्के भुकटीहेक्टरी 20 किलो या प्रमाणात कणसावर धुरळावी.
गवती नाकतोडे : ही किड अनेक पिकावर आढळुन येते. तसेच घोडे ह्या नावाने सर्वांचे परीचयाचे आहे. मका यापिकावर 2–3 प्रकारचे नाकतोडे आढळुन येतात. त्यांचे विविध रंग काहिसा हिरवट व सुकलेल्या गवतासारखा असतो. ह्या किडीची पिल्ले व प्रौढ पिकांची पाणे खाउन नुकसान करतात. टोळांनी केलेले नुकसान लश्करी अळीसारथे वाटटते. सुरवातीला या किडीचे पिल्ले कोवळ्या गवतावर उपजिवीका करतात. त्यामुळे धु-याक़ील पिकावर या किडीचे प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसुन येते.
या किडीटा मादी साधारणपणे 20 ते 40 अंडी एका पुमजक्यात घालते. अंडी जमिणीवर घातलेली आढळते. टोळांची पिल्ले अंड्यातुन बाहेर आल्यावर अनेकदा कात टाकतात. आणि सामान्यपणे दोन महिन्यामध्ये प्रौढावस्थेत पोचतात. या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येताच मिथीलपरॉथीऑन 2 % भुकटी हेक्टरी 20 किलो या प्रमाणात पिकावर धुरळावी.
संदर्भ : शेतीमित्र मासिक (तृणधान्य विशेषांक)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा