सुगंधी वनस्पतींना जगभर मागणी चांगली आहे. अशा मागणी, वनस्पतींची लागवड करूनच पूर्ण करता येईल. कोकणाला सुगंधी वनस्पती नवीन नाहीत. कोकण हे सुगंधी वनस्पतींचे माहेर घर आहे. पावसाळ्यात कोकणाच्या डोंगरावर, जंगलात भरपूर वनस्पती वाढताना दिसतात. काही वनस्पतींचा लागवडीसाठी उष्ण व दमट हवामान फायदेशीर ठरते. वनस्पतीमध्ये सुंगधी द्रव्ये उडनशील तेलाच्या स्वरूपात असतात. जास्त तापमानात तेलाचे प्रमाण कामी होते. आपल्या राज्यातील हवामान सुगंधी वनस्पती लागवडीस फारसे अनुकूल नसले तरी कोकणातील नारळाच्या बागेत डोंगर उतारावर माका या सुगंधी वनस्पतीची लागवड करता येईल.
माका ही अॅस्टरॅसि कुळातील सुगंधी वनस्पती आहे. भृंगराज (सं), भंगरा (हिं), माका (म) अशा विविध नावानी ओळखली जाणारी ही वनस्पती पाणथळ जागेत दिसते. या वनस्पतींचा उष्णतादर्शक, वात, कफ कमी करण्यासाठी उपयोग करतात. इक्लेप्टीन अल्कलाईड कातडीच्या रोगावर, सुजेवर, रक्तप्रवाह, थांबविण्यासाठी वापरतात. तेलाचा उपयोग केस वाढीसाठीही करतात.
जमीन व हवामान : सर्व प्रकारच्या जमिनीत पाणथळ जागेच्या ठिकाणी ही वनस्पती वाढीस मानवते. वनस्पतीच्या वाढीस २०० ते ३५० सें. तापमान व ८० टक्केपर्यंत आर्द्रता लागते.
पूर्व मशागत : ही वनस्पती पाणथळ जागेत वाढत असल्यामुळे जास्त पाणी लागणार्या नारळ, सुपारी, केळीच्या बागेत द्यावे.
लागवड : माका हे अंतरपीक म्हणून मुख्य पिकामध्ये ३०x३०x३० सें. मी. अंतरावर रोपे अंतरावर रोपे तयार करून लावावीत. या पिकास वेगळी खते देण्याची आवश्यक नाही.
पाणी व्यवस्थापन : मुख्य पिकास पाणी देते वेळी संपूर्ण जमीन ओली होईल. याची काळजी घ्यावी व जमीन सतत ओली ठेवावी.
कापणी : पहिली कापणी साधारणपणे १०० ते १२० दिवसांनी करतात. कापणी करते वेळी ५० टक्के फांद्या कापाव्यात. पहिल्या कापणीनंतर पुढील ७५ ते ९० दिवसांनी करावी. कापलेल्या फांद्या सावलीत वाळवाव्यात.
उत्पन्न : पहिल्या वर्षी आडीच ते तीन टन ओल्या फांद्या मिळतात व दुसर्या वर्षी साडेतीन ते चार टन ओल्या फांद्या मिळतात.
डॉ. अमोल मिसाळ, श्री. जयकुमार देशमुख, वर्षा मरवाळीकर कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर, जि.उस्मानाबाद.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा