• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Thursday, June 5, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

असे करा परसबागेतील कुक्कुटपालन

शेतीमित्र by शेतीमित्र
June 28, 2022
in कोंबडी पालन
0
असे करा परसबागेतील कुक्कुटपालन
0
SHARES
14
VIEWS

स्थानिक गावरान कोंबडीची उत्पादकता कमी असूनही भारतीय अंडी उत्पादनात परसातील कोंबड्यांचा १७.८ टक्के (18.41 अब्ज अंडीनिर्मिती) वाटा आहे. आजही ग्रामीण भागातील अंडी आणि चिकनची मागणी परसातील कुक्कुटपालनाद्वारे पूर्ण केली जाते. परसातील कुक्कुटपालनामध्ये मुख्यत्वेकरून कमी उत्पादन देणाऱ्या मूळ गावरान किंवा देशी कोंबड्यांचा संगोपनासाठी समावेश होतो. अशा परिस्थितीत परसातील कुक्कुटपालनातून उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी देशी कोंबड्यांच्या बरोबरीने (कडकनाथ, असील, फ्रिजल, मानसोली, अंकलेश्‍वर, तेलीचेरी, मिरी इत्यादी) कोंबड्यांच्या सुधारित जातींचे संगोपन वापर करून त्यांची उत्पादकता सुधारता येते. भारतातील संशोधन संस्थांनी विविध भागात वेगवेगळ्या कोंबड्यांच्या सुधारित जाती (गिरिराज, वनराज, कावेरी, ग्रामश्री, ग्रामप्रिया इ.) विकसित केल्या आहेत.

परसबागेतील कोंबड्यांचे व्यवस्थापन 

1) परसबागेमध्ये गावरान देशी कोंबड्यांपेक्षा सुधारित जातीच्या कोंबड्या जास्त अंडी देतात. साधारणतः देशी कोंबड्यांचे उत्पादन वर्षाकाठी ६० ते ७० अंडी असते. त्यामानाने सुधारित कोंबड्यांचे अंडी उत्पादन १०० ते १८० या दरम्यान असते. सुधारित कोंबड्यांच्या जातीची वाढ गतीने होत असल्यामुळे मांस उत्पादनासाठी लवकर तयार होतात. गावरान देशी कोंबड्यांप्रमाणे सुधारित जातीसुद्धा प्रतिकूल वातावरणामध्ये तग धरून राहू शकतात.

फायद्याच्या टिप्स : पावसाळ्यात घ्या कोंबड्यांची निगा

2) कोंबडी संगोपन करताना संगोपन उपलब्ध धान्याचा विचार करून घरगुती खाद्य सूत्र तयार करावे. कारण आहार समतोल राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. वाया गेलेली ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, सुकट, तसेच शिंपले, मीठ, क्षार आणि जीवनसत्त्वे इत्यादींचा वापर करून परसबागेतील कोंबड्यांसाठी पूरक खाद्य बनविणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.

3) घरगुती तयार केलेले २५ ते ३० ग्रॅम पूरक खाद्य प्रति कोंबडी प्रति दिन द्यावे. दिवसातून दोन वेळा खाद्य विभागून दिल्यास कोंबड्यांचा आहार समतोल राखण्यास मदत होऊ शकते. कोंबड्यांना परसबागेतून फिरून जी पोषणतत्त्वे मिळू शकणार नाहीत अशी पोषणतत्त्वे पूरक खाद्यामार्फत मिळाल्यास अंडी, मांस उत्पादनावर चांगला परिणाम होतो.

4) सुरुवातीला उपलब्ध असलेल्या 15 ते 20 कोंबड्यांमधून पुढच्या वर्षासाठी नवीन पिले निर्मितीसाठी खुडूक कोंबडीचा वापर केला जातो. परंतु आपण एकाच वेळेस साधारणतः चार ते पाच खुडूक कोंबड्याचा वापर करून जास्तीत जास्त पिलेनिर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाठी खुडूक कोंबडी कशी ओळखावी, फलित अंड्याची तपासणी कशी करावी, खुडूक कोंबडीसाठी वापरले जाणारी जागा कशी असावी, कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दलचे शास्त्रीय ज्ञान असणे आवश्यक आहे.

नक्की वाचा : कोंबड्यांच्या फायदेशीर जाती

5) नैसर्गिक अंडी उबवणूक करून तयार झालेल्या पिल्लांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. पिल्लांची निर्मिती झाल्यानंतर खुडूक कोंबडीचे विलगीकरण करून कमीत कमी एक ते दोन महिने

पिलांचे संगोपन बंदिस्त पद्धतीने करावे. सुरवातीच्या काळात पिलांची वाढ जलद गतीने होते. पिल्लांना खाद्यामध्ये प्रथिनांची गरज जास्त असते. तसे प्रथिनयुक्त खाद्य दिल्यास बंदिस्त पद्धतीने त्यांची वाढ केल्यास मरतुकीचे प्रमाण कमी होते.

6) नैसर्गिक अंडी उबवणूक करण्याआधी फलित अंडी निवड, साठवणूक, त्यांची काळजी व उबवणुकीच्या कालावधीत अंड्याच्या दिवा तपासणीतून भ्रूणवाढ स्थिती तपासणे अशा शास्त्रीय ज्ञानाचा वापर करून उत्तमरीत्या पिले निर्मिती करता येते.

7) परसबागेतील कुक्कुटपालनाकडे पारंपारिक पद्धतीने न बघता व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिल्यास नक्कीच उत्पादनात वाढ होऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. परसबागेतील कुक्कुटपालनामध्ये भांडवली खर्च कमी असतो.

8) कोंबडी संगोपन करताना पारंपारिक खुरड्याचा वापर न करता आपण उपलब्ध साधनसामग्रीतून शास्त्रीयदृष्ट्या बनविलेल्या खुरड्याचा वापर करावा. यामुळे कोंबड्यांचे नियोजन, स्वच्छता, शत्रूपासून संरक्षण, खाद्य नियोजन, औषधोपचार सुलभरीत्या करता येऊ शकतो. परिणामी उत्पादनात वाढ होते.

9) सुधारित कोंबड्यांचे लसीकरण, औषधोपचार, पिण्याचे पाण्याचे निर्जंतुकीकरण, जंतनिर्मूलन, रात्री खुरड्यामध्ये कोंबड्यांना दिली जाणारी जागा इत्यादी गोष्टींची पूर्तता केल्यास उत्पादनात वाढ होते.

10) अंडी कवचाची प्रत सुधारणा आणि कोंबड्यांतील टोच्या मारणे, पिसे उपटण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी खाद्यामध्ये शिंपल्यांचा वापर करावा. रोजच्या आहारामध्ये हिरव्या चाऱ्याचा वापर करावा.

महत्त्वाच्या टिप्स : उन्हाळ्यात कोंबड्यांची अशी घ्या काळजी

11) नवीन पिले उत्पादित केल्यानंतर त्यामध्ये ५० टक्के नर व ५० टक्के मादी पिल्लांचा समावेश असतो त्यामुळे पैदाशीचे नर (प्रति १२ माद्यांमागे १ नर प्रमाणे) वगळून उर्वरित नरांची विक्री साधारणतः सहा महिन्यांनी करावी.

असे करावे व्यवस्थापन :

1) स्वतः तयार केलेल्या कोंबड्यांच्या पैदाशीसाठी नर न ठेवता शेजारील पक्षिपालकांच्या कळपामधील नवीन नर पैदाशीसाठी वापरावेत किंवा नवीन उत्तम प्रतीच्या संकरित कोंबड्यांची खरेदी करून त्यांचा समावेश आपल्या कळपामध्ये (प्रति 12 माद्यांमागे 1 नर) केल्यास पुढील पिढीमध्ये तयार झालेल्या कोंबड्यांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते. कोबड्याची अदलाबदल करावी किंवा नवीन सुधारित जातीचा कोंबडा वापरावा.

2) बरेच शेतकरी परसातील कुक्कुटपालन करत असताना दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोंबडा कळपामध्ये संकरण करण्यासाठी ठेवतात. परंतु दोन वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कोंबड्याची वीर्य उत्पादनक्षमता कमी होऊ शकते. त्याच्या शुक्राणूवरती वयाचा विपरीत परिणाम होतो. परिणामी कमी फलित अंडी मिळतात. म्हणून परसबागेमध्ये पक्षिपालन करत असताना प्रत्येक वर्षी नवीन कोंबड्याचा संक्रमणासाठी वापर करावा. त्यामुळे मिळणाऱ्या फलित अंड्याची संख्या वाढू शकते.

नक्की वाचा : कसे करावे लाव्ही पालन ?

3) बरेचसे शेतकरी देवी, मानमोडी इत्यादी विषाणूजन्य रोगांचे लसीकरण करण्याचे टाळतात, परंतु अशा रोगाची लागण झाल्यास औषधोपचारानेसुद्धा कोंबड्या वाचणे अवघड जाते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने परसातील कुक्कुटपालन करत असताना कोंबड्यांचे लसीकरण करावे. शास्त्रीय कुक्कुटपालन प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

4) शास्त्रीयरीत्या कोंबड्यांचे संगोपन केल्यास परसबागेतील 15 ते 20 कोंबडी संगोपनऐवजी आपण 100  ते 500 सुधारित जातीच्या कोंबड्यांचे संगोपन शक्य आहे.

डॉ. विजयसिंह लोणकर, सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा 7875570392

नक्की वाचा : कसे करावे बदक पालन ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: How to take care of chickens?Improved breeds of Gavaran native hensManagement of hens in the backyardकोंबड्यांची काळजी कशी घ्यावी ?गावरान देशी कोंबड्यांच्या सुधारित जातीपरसबागेतील कोंबड्यांचे व्यवस्थापन
Previous Post

शेतकऱ्यांनी आडवला कृषी आयुक्तांचा ताफा

Next Post

एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री

Related Posts

कोंबडयामधील बर्ड फ्लू रोग : प्रतिबंधात्मक उपाय
कोंबडी पालन

कोंबडयामधील बर्ड फ्लू रोग : प्रतिबंधात्मक उपाय

March 29, 2025
उन्हाळ्यात कोंबड्यांची अशी घ्या काळजी
कोंबडी पालन

उन्हाळ्यात कोंबड्यांची अशी घ्या काळजी

May 18, 2022
कोंबड्यांच्या फायदेशीर जाती
कोंबडी पालन

कोंबड्यांच्या फायदेशीर जाती

October 16, 2021
पावसाळ्यात घ्या कोंबड्यांची निगा
कोंबडी पालन

पावसाळ्यात घ्या कोंबड्यांची निगा

July 21, 2021
कसे करावे लाव्ही पालन ?
कोंबडी पालन

कसे करावे लाव्ही पालन ?

December 30, 2020
कसे करावे बदक पालन ?
कोंबडी पालन

कसे करावे बदक पालन ?

December 30, 2020
Next Post
एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230498
Users Today : 13
Users Last 30 days : 1403
Users This Month : 97
Users This Year : 4828
Total Users : 230498
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us