सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून, परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. अशातच हवामान विभागाने 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान, मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार असल्याची माहिती दिली आहे.
महत्त्वाची बातमी : लम्पी स्कीन आजारावर आता सरसकट लसीकरण : विखे पाटील
दरम्यान, मान्सून वेळेत परतत असल्याने शेतकऱ्यांनी आता नेमकी कोणती कामे करावीत. पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काय नियोजन करावे यासंदर्भातील ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे. सध्या परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने पिकांच्या नुकसानीची शक्यता धूसर असल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून परत फिरणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी लगबग करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे टाकण्यास काही हरकत नाही. साधारणात: बियाणे टाकल्यापासून 45 दिवसांमध्ये कांद्याची रोपे लागवडीसाठी तयार होता. त्यामुळे आता कांद्याचे बी टाकले तरी चालेल.
मोठी बातमी : नुकसान झाले त्यांना भरीव मदत मिळणारच : कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना वचन
द्राक्ष बागेची छाटणी शेतकऱ्यांनी केली तरी चालेल. छाटणी करण्यास अडचण काही नाही. कारण, सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पाऊस निरोप घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे द्राक्ष बागांच्या छाटणीला सुरुवात केली तरी चालेत. त्याचबरोबर डाळींबाची पानगळणी केली तरी चालेल. कारण आता जर पानाची छाटणी सुरु केली तर मार्च ते एप्रिलपर्यंत पिक बाजारात येईल, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होईल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. ‘हस्त बहार’ नियोजन करण्यास सध्याचा काळ योग्य जाणवत आहे. सध्याची पानगळणी कदाचित भविष्यातील फळतोडणी कदाचित गारपीट कालावधीच्या बाहेर घेऊन जाईल, असेही वाटत असल्याचे खुळे यावेळी सांगितले आहे.
खरीपातील मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, कडधान्ये ही पिके परतणीच्या स्टेजमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांच्या काढणीच्या तसेच पशुधनासाठीच्या मुरघास प्रक्रिया आणि साठवणीच्या नियोजनासाठीचा वातावरणाच्या नजरेतून सध्याचा काळ योग्य जाणवत आहे. त्याचे योग्य ते नियोजन करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात करावी. सोयाबीन आणि बाजरीचे पिक काढणी करण्याच्या स्टेजमध्ये आहे. त्यासाठी पूर्वनियोजन करावे लागते. विशेषत: मजूर लावून करायची असेल तर त्याचे नियोजन मशीनने काढणी करायची असेल तर त्याचे शेतकऱ्यांनी आत्ताच नियोजन करावे असे खुळे यांनी सांगितले आहे.
मोठा निर्णय : बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची वर्णी
मका आता कापणी करायला सुरुवात केली तरी चालेल. ज्या शेतकऱ्यांना मुरघास तयार करायचा आहे, असा शेतकऱ्यांनी मकेची तोडणी करावी असे खुळे यांनी सांगितले आहे. तर बाजरी, भुईमूग, सोयाबीन, ही पिके 15 ऑक्टोबरच्यानंतर काढणीसाठी येणार आहेत, त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी आत्तापासूनच नियोजन करावे, असे खुळे यांनी सांगितले आहे.
मोठी बातमी : यंदा खरिपात 149.92 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1