यंदा एप्रिल महिन्यातील तापमानाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आता मे हिट सुरू झाली आहे. उन्हाचा पारा वरचेवर चांगलाच तापत चालला आहे. देशभरात उन्हाच्या झळ आणि उष्णता जाणवत आहे. या उष्णतेच्या काळात अनेकांना जुलाब-उलट्या, विषबाधा, घामोळ्या अशा अनेक प्रकराच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्या आरोग्याच काळजी घेणे गरजचे आहे.
उन्हाळ्यामध्ये आपल्या खाण्या-पिण्याकडे थोडे तरी दुर्लक्ष झाले तरी तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा लागेल, ज्यामुळे जेवण सहज पचेल आणि तुमच्या शरीराला चांगला आराम मिळेल. यासाठी आहारात हंगामी फळे, सालद आदींचा समावेश करणे गरजेचे असते.
हे वाचा : आंब्यापासून तयार करा स्वादिष्ट पदार्थ
शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण ठेवा : दिवसातुन कमीत कमी ३ ते ४ ग्लास पाणी अवश्य प्या. उन्हाच्या दिवसात आपल्या शरीरातील पाणी घामाच्या रूपात बाहेर पडतं, म्हणुन शरीरात पाण्याची कमतरता पडल्यास तब्येतीवर परीणाम होऊ शकतो, म्हणुन उन्हाळयाच्या दिवसांत पाणी भरपुर प्रमाणात प्यावे. विशेष करून नॉचरल फुडचा ब्राऊन टी घ्यावा. नॉचरल फुड पासून तयार केलेला हा हर्बल ब्राऊन टी नक्कीच तुम्हाला मे हिटमध्येही उत्साहवर्धक करेल.
उन्हापासून स्वतःला वाचवा : उन्हात बाहेर पडतांना स्वतःला उन्हाच्या तिव्र किरणांपासुन वाचवा. याकरता आपण टोपी किंवा रूमालाचा उपयोग करू शकता किंवा एखादे नैसर्गिक तत्व असलेले सनस्क्रीन लावा ज्यात जास्त केमीकल्स नसतील. बाहेर जातांना आपल्यासोबत अॅलोव्हेरा जेल सोबत ठेवा त्यामुळे तुमचे उन्हापासुन संरक्षण होईल.

आरोग्याची माहिती : शेवग्यापासून बनवा आरोग्यदायी प्रक्रियायुक्त पदार्थ
सकाळी व्यायाम करा : तुम्ही व्यायाम किंवा कसरती देखील करू शकता. हृदय आणि स्वास्थ्य चांगले ठेवण्याकरता व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. जर तुम्ही जास्त काम करत असाल तर तुम्हाला पायी लांब यात्रा, स्विमिंग किंवा टेनिस खेळायला हवे. हे केल्यास तुमचे शरीर सुदृढ राहील आणि मेंदु ही कार्यक्षम राहील.
नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्या : मोसमी फळे आणि भाज्यांचे सेवन करणे देखील लाभदायी असते. जी फळं शरीराला थंडावा देतात आणि शरीराकरता हलके असतात अशी ताजी फळं, भाज्या, ज्युस, सलाद आणि जास्तीत जास्त पाणी शरीराला या दिवसांत तंदुरूस्त ठेवण्यास सहाय्यक असतात. उन्हाळयात प्रोटीनयुक्त आणि नॉचरल फुडचा आपल्या जेवणात समावेश असावा. फळ, भाज्या, बीया असलेले पदार्थ, मोड आलेली कडधान्य, सोयाबीन चे पदार्थ, दही, लस्सी आणि पनीर यांचे सेवनही उन्हाच्या दिवसात लाभदायक असते. उन्हाळयात आपण मास, मासोळया देखील खाऊ शकता.
हे नक्की वाचा : पनीर निर्मितीतून मिळवा किफायतशिर नफा
बाहेर मित्रांसोबत वेळ घालावा : उन्हाळयाच्या दिवसात आपण आपल्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत बाहेर वेळ घालवा. सक्षम असल्यास एखादया लांबच्या यात्रेला देखील आपण जाऊ शकता किंवा मैदानी खेळ खेळा, कॅंप ला जा, नदीकिनारी जाऊन मजा करा, कौटुंबिक नातेसंबंध जपा ज्यामुळे तुमचे आयुष्य आनंदी राहील.
शांत राहणे शिका : जेव्हा तुम्ही कठीण मेहनत केली असेल तेव्हा आरामात लांब श्वास घ्या. हा एक असा ऋतु आहे ज्यात तुम्ही शांत राहायला हवं आणि भरपुर सुर्य किरणांना आत्मसात करायला हवे जे तुमच्या हार्मोनल मॅसेज सेंटर ला उत्तेजीत करतील. तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉप ला घरी सोडुन कुठेतरी आठवडाभर फिरायला जा. या उपयांना जर आपण अमलात आणलं तर तुम्ही प्रकृतीचा अनुभव घेऊ शकाल. जास्त उन्हात देखील कुठे जाऊ नका आणि जास्तीत जास्त पाणी प्या.
नक्की वाचा : टोमॅटोपासून तयार करा, प्रक्रियायुक्त पदार्थ
उन्हाळ्यात ही काळजी महत्वाची : कडक उन्हाळ्यात आपण आपलं शरीर पूर्णपणे झाकून घेऊ शकू अश्या प्रकारचे फिकट रंगाचे कपडे आपण परिधान केले पाहिजात. पूर्ण बाह्याचे कपडे किंवा तरुणींनी सनकोट सुती स्टोल वापरावा. घराच्या बाहेर जातांना आपण आपले डोक दुपट्याच्या सह्याने पूर्णपणे झाकून घेतलं पाहिजे. कामानिमित्त घराबाहेर जातांना सोबत पाण्याची बॉंटल न्या. उन्हाळ्यात जास्तीतजास्त पाण्याचे सेवन करा. सुर्यकिरणामुळे त्वचा कोरडी पडते, त्यामुळे बाहेर जातांना सनस्क्रीन लोशन वापरावे. गरज असल्यास छत्रीचा वापर करा. चहा, कॉफी, आणि मद्यपान या गोष्टीचे सेवन करणे टाळा. कारण यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते. संत्री, कलिंगड आणि लिंबू यासारख्या रसाळ फळांचे सेवन करा. जेवण एकाच वेळेला न करता दिवसातून थोड थोड घ्या. शक्य असल्यास दुपारी झोप घ्यावी, यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल. उन्हाळ्यात शक्यतो मसाल्याच्या पदार्थ टाळावे, तेलकट पदार्थ वर्ज्य करा. साधे जेवण घ्या.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1