सततच्या बदलत्या हवामानामुळे, उन्हाळ्यात पडणारा अवकाळी पाऊस यामुळे हुमणी या किडीचा ऊस शेतीमध्ये प्रादुर्भाव मागील दोन वर्ष पासून वाढत आहे. परिणामी प्रामुख्याने पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आढळून येते. ही कीड पिकांच्या मुळांवर उपजीविका करते. महाराष्ट्रात प्रामुख्याने उसाबरोबरच सोयाबीन, कापूस, ऊस, अद्रक व हळद या पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.
फायद्याच्या टिप्स : मका पिकावर लष्करी अळीचा हल्लाबोल !
प्रथम अवस्थेतील हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रीय पदार्थावर उपजीविका करतात. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ऊस, सोयाबीन, कापूस, अद्रक व हळद या पिकांची मुळे खातात. त्यामुळे पिकांची पाने पिवळी पडून पीक दिवसात अळ्या जमिनीत 90 ते 120 सेंमी खोलवर कोष अवस्थेत जातात. कोषातून मुंगेरे निघून जमिनीतच राहतात आणि मे किंवा जूनच्या पहिल्या पावसात ते जमिनीतून बाहेर पडतात. सरासरी या किडीमुळे 50 टक्यापेक्षा ही जास्त नुकसान आढळून येते.
हा लेख वाचा : मका पिकावरील किडींचे असे करा व्यवस्थापन
1. कडुनिंब, बाभूळ, बोर आदी झाडांवरील भुंगेरे रात्री सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान काठीच्या साह्याने फांद्या हलवून खाली पाडून जमा करावेत. भुंगेरे रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.
2. सामूहिकरित्या भुंगेरे गोळा करण्यासाठी 1 हेक्टर क्षेत्रात 1 प्रकाश सापळा लावा.
3. हुमणीग्रस्त भागांमध्ये एप्रिल-मे महिन्यात उभी व आडवी नांगरट करून हुमणीच्या अळ्या गोळा करून त्यांचा नाश करावा.
फायद्याचा लेख : गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी या बाबी लक्षात घ्या !
4. अळी सुरूवातीला सेंद्रीय पदार्थावर जगते तेव्हा खरीप हंगामात जमिनीत शेणखत टाकताना खताबरोबर हेक्टरी 20 किलो मेटारायझियम किंवा बिव्हेरिया बॅसियाना 2 किलो बुरशी मिसळून टाकावी.
5. निंदणी करताना अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
6. झाडावर 20 किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास क्लोरोपायरीफॉस (20 टक्के प्रवाही) 25 ते 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. 15 दिवस जनावरांना फवारणी केलेल्या झाडाची पाने खाद्यामध्ये देऊ नयेत.
8. फिप्रोनील (0.3 टक्के दाणेदार) 25 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात जमिनीत ओल असताना द्यावे.
9. फिप्रोनील (40 टक्के) आणि इमिडाक्लोप्रीड (40 टक्के) हे संयुक्त कीटकनाशक 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून उसामध्ये फवारणी किंवा आळवणी करावी.
नक्की वाचा : ज्वारी पिकाचे रोग व नियंत्रण
10. शेतकऱ्यांनी सामूहिकपणे 2 ते 3 वर्ष हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.
11. नुकसानीचे स्वरूप लक्षात घेता, ऊभा ऊस किंवा खोडव्याच्यामध्ये पहारीने ऊसाच्या बुंध्यालगत खड्डा काढून त्यात हुमणीचा प्रादुर्भाव दिसू लागताच. क्लोरोपायरीफॉस हेक्टरी 1 लि. 500 लि. पाण्यात मिसळून पंपाचे नोझल काढून कच्च्या घातीवर पहारीने नाळे मारून आळवणी करावी. वरील सर्व उपाय सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे.
12. फोरेट 10 जी 20 किलो किंवा फीप्रोनिल दाणेदार 10 किलो समप्रमाणात मातीत मिसळून कच्या घातीवर टाकावे.
13. किटकभक्षक इपीएन (EPN) कल्चर 50 मिलि 10 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावे किंवा 2.5 लिटर प्रति हेक्टरी ठिबक किंवा प्रवाही सिंचनातून द्यावे.
डॉ. दादासाहेब खोगरे, कृषी विज्ञान केंद्र, तडसर, ता. कडेगाव जि. सांगली (मो. 9370006598)
महत्त्वाची माहिती : असे करा भातावरील किडीचे प्रभावी व्यवस्थापन
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1