पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे देशातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत, उत्पन्न वाढलेल्या 75 हजार शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे संकलन असलेल्या ई-पुस्तकाचे प्रकाशन तोमर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
आनंदाची बातमी : महाराष्ट्राच्या तीन पिकांच्या वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, केंद्र आणि राज्य सरकारांसह भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), कृषी विज्ञान केंद्रे यासह अनेक घटकांनी एकत्रित प्रयत्न केले आहेत. त्यामुळे हे शक्य झाल्याचे तोमर यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे हे संकलन देशाच्या इतिहासात मैलाचा दगड म्हणून नोंदले जाईल, असे सांगून ते म्हणाले, भारतीय कृषी संशोधन परिषदेचा स्थापना दिवस ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा केला पाहिजे. यानिमित्ताने वर्षभराचे संकल्प करुन ते पुढील स्थापना दिनापर्यंत पूर्ण करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मोठी बातमी : पावसामुळे राज्यात तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
आयसीएआरची स्थापना होऊन 93 वर्षे झाली असल्याचे सांगून ते म्हणाले, आयसीएआरने 1929 मध्ये स्थापन झाल्यापासून आजपर्यंत सुमारे 5 हजार 800 बियाणांचे वाण बाजारात आणले आहेत. 2014 पासून आतापर्यंतच्या आठ वर्षात त्यापैकी सुमारे 2 हजार जातींचा समावेश आहे. ही अतिशय महत्त्वाची कामगिरी आहे. यामध्ये बागायती, हवामानास अनुकूल आणि फोर्टिफाइड वाणांचे बियाणे समाविष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आज आपण हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देत आहोत. वैज्ञानिकांसाठी ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. भारताच्या कृषी निर्यातीत आणखी सुधारणा व्हावी, यासाठी आपल्याला या दिशेने एक रोडमॅप तयार करावा लागेल. त्याचे परिणाम देशासमोर मांडावे लागतील. यामध्ये सर्व कृषी विज्ञान केंद्र आणि आयसीएआर संस्थांच्या शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही तोमर म्हणाले.
ब्रेकिंग न्यूज : जीएसटी निणर्याचा शेतकऱ्यांना दुहेरी फटका
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1